कोल्हापूर ते पुणे एसटीने वेग पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 06:15 PM2021-06-02T18:15:31+5:302021-06-02T18:16:55+5:30

CoronaVirus St Kolhapur : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असताना एसटीनेही सेवा विस्तार वाढवण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर-पुणे मार्गावर सुरू झालेल्या एसटीने आता वेग पकडला आहे. बुधवारी कोल्हापूर डेपोच्या चार, शिवाजीनगर व स्वारगेटच्या प्रत्येकी दोन अशा आठ गाड्यांमधून कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातून साधारणपणे दोनशेंच्यावर प्रवाशांनी प्रवास केला.

Kolhapur to Pune ST picked up speed | कोल्हापूर ते पुणे एसटीने वेग पकडला

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातून पुण्याकडे कोरोनासंबंधीचे सर्व नियमांचे पालन करून पुणे मार्गावर एसटी महामंडळाने फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकांवर थोडीफार वर्दळ दिसू लागली आहे. (छाया: नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देकोल्हापूर ते पुणे एसटीने वेग पकडला

कोल्हापूर : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असताना एसटीनेही सेवा विस्तार वाढवण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर-पुणे मार्गावर सुरू झालेल्या एसटीने आता वेग पकडला आहे. बुधवारी कोल्हापूर डेपोच्या चार, शिवाजीनगर व स्वारगेटच्या प्रत्येकी दोन अशा आठ गाड्यांमधून कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातून साधारणपणे दोनशेंच्यावर प्रवाशांनी प्रवास केला. दरम्यान, प्रवासी संख्या वाढेल तशा प्रमुख मार्गांवरील फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याचे एसटीच्या वाहतूक शाखेने सांगितले.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कडक केल्यापासून एसटीच्या फेऱ्या अत्यावश्यक सेवा वगळता बंदच होत्या. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने एसटी सेवा हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी चांगला प्रतिसाद मिळाल्याने बुधवारीदेखील एसटी पुणे मार्गावर सोडण्यात आल्या.

५० टक्के भारमानाच्या नियमाचे पालन करत एकेका एसटीमध्ये २० प्रवासी घेऊनच एसटी धावत आहे. सॅनिटायझर सुविधेसह मास्क बंधनकारक आहे. एक सीट आड अशी बैठक व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

अजूनही गाडी सुटण्याच्या वेळा निश्चित नाहीत, पण तास ते दीड तासाच्या अंतराने एक बस सुटेल असे नियोजन वाहतूक शाखेकडून केले जात आहे. एसटी नियमानुसार प्रवाशांची संख्या झाल्यावर सोडली जात आहे. प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत असलीतरी काही नसण्यापेक्षा काहीतरी आहे, असे समजून प्रवासी सहकार्य करताना दिसत आहेत.

 

Web Title: Kolhapur to Pune ST picked up speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.