कोल्हापूर : युवा मतदारांना ‘पीव्हीसी’ मतदार छायाचित्र ओळखपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 05:38 PM2019-01-01T17:38:20+5:302019-01-01T17:40:38+5:30
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात २५ जानेवारीला ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा केला जाणार आहे. या दिवशी नव्याने नोंदणी केलेल्या युवा मतदारांना समारंभपूर्वक ‘पीव्हीसी’ मतदार छायाचित्र ओळखपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सोमवारी (दि. ३१) येथे दिली.
कोल्हापूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात २५ जानेवारीला ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा केला जाणार आहे. या दिवशी नव्याने नोंदणी केलेल्या युवा मतदारांना समारंभपूर्वक ‘पीव्हीसी’ मतदार छायाचित्र ओळखपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सोमवारी (दि. ३१) येथे दिली.
या दिवशी तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर नव्याने नावनोंदणी केलेल्या युवा मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत समारंभपूर्वक ‘पीव्हीसी’ मतदार छायाचित्र ओळखपत्र दिले जाणार आहेत.
नव्याने नावनोंदणी केलेल्या मतदारांनी २५ जानेवारीला आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपले ‘पीव्हीसी’ मतदार छायाचित्र ओळखपत्र घ्यावे. तसेच यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये सर्व मतदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी सुभेदार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.