कोल्हापूृर : ‘रंकाळ्या’ची कोनशिला केली कचरामुक्त, १३५ वर्षाचा इतिहास पुन्हा जागृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 05:01 PM2018-10-23T17:01:41+5:302018-10-23T17:02:39+5:30
कोल्हापूरी साज समजल्या जाणाऱ्या रंकाळा तलावाच्या इतिहासाची साक्ष देणारी कोनशिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये लप्त झाली होती. आमचा रंकाळा असे असे छाती फुगवून दिमाखात सांगणााऱ्यांचाही या कोनशिलेकडे दुर्लक्ष होते.
कोल्हापूृर : कोल्हापूरी साज समजल्या जाणाऱ्या रंकाळा तलावाच्या इतिहासाची साक्ष देणारी कोनशिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये लप्त झाली होती. आमचा रंकाळा असे असे छाती फुगवून दिमाखात सांगणााऱ्यांचाही या कोनशिलेकडे दुर्लक्ष होते.
अखेर या १८७७ मध्ये रंकाळा तलावाचे बांधकाम करताना बसविलेल्या कोनशिलेवर रंकाळा संरक्षण व संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांची नजर पडली, अन् या समितीच्या कार्यकर्त्यानी ही राजघाट येथील कोनशिला कचरामुक्त केली. रंकाळा प्रेमींनी तिची रंगरंगोटी करुन तिचे श्रीफळ वाढवून पुजन केले, अन् १३५ वर्षापूर्वीचा इतिहास पुन्हा जागृत केला.
छत्रपती शिवाजी चौथे हे अल्पवयीन असताना १८७७ मध्ये रंकाळा तलावाच्या बांधकामास सुरुवात झाली. जयसिंगराव कागलकर हे संस्थानंचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली १८८३ ला तलावाचे बांधकाम पूर्ण झाले. त्यावेळी दोन लाख ५२ हजार रुपये खर्च झाला.
रंकाळावर एकून पाच घाट आहेत. त्यातील रंकाळा टॉवर शेजारील राजघाटाजवळ एका बाजूला इंग्रजीत व दुसऱ्या बाजूला मराठीत या कोनशिला बसविली आहे. राजघाटाजवळ रंकाळयातील सर्व केरकचरा काढून कोनाशिलेंजवळच टाकला जात होता. त्यामुळे ती कोनशिला कचऱ्यातच ढिगात झाकून गेली होती.
रंकाळा संरक्षण व संवर्धन समितीचे विकास जाधव व अभिजीत चौगले यांनी पुढाकार घेऊन कोनशिला कचरा मुक्त करून रंगवली. विजय सावंत व श्रीकांत थोरात यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी रंकाळा समितीचे अॅड.अजित चव्हाण, दिग्दर्शक यशवंत भालकर, राजेंद्र पाटील, संजय मांगलेकर, प्रा.एस.पी. चौगले, यशवंत पाटील, शाहीर दिलीप सावंत, सुभाष हराळे, श्रीकांत जोशी, राजशेखर तंबाके, केदार यादव, सचिन जाधव, प्रशांत गडकरी, नितीन गुंजूटे, पद्माकर रेळेकर, सुधीर हराळे, किसन चव्हाण, कल्पना कुलकर्णी, निलिमा हिरेमठ,जयश्री होतकुंडे उपस्थित होते.