कोल्हापूर : शिरोलीतील कुंटणखान्यावर छापा, दोघांना अटक, दोन पीडित महिलांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 01:13 PM2018-07-04T13:13:39+5:302018-07-04T13:15:40+5:30

कोल्हापूर-सांगली मार्गावर शिरोली एमआयडीसी येथील अभिषेक लॉजिंग व रेस्टॉरंट मल्टिपर्पज हॉल येथील कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून व्यवस्थापकासह दोघांना अटक केली.

Kolhapur: The raid on Shirala, two arrested and two afflicted women were released | कोल्हापूर : शिरोलीतील कुंटणखान्यावर छापा, दोघांना अटक, दोन पीडित महिलांची सुटका

कोल्हापूर : शिरोलीतील कुंटणखान्यावर छापा, दोघांना अटक, दोन पीडित महिलांची सुटका

Next
ठळक मुद्देशिरोलीतील कुंटणखान्यावर छापा दोघांना अटक, दोन पीडित महिलांची सुटका

कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली मार्गावर शिरोली एमआयडीसी येथील अभिषेक लॉजिंग व रेस्टॉरंट मल्टिपर्पज हॉल येथील कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून व्यवस्थापकासह दोघांना अटक केली.

सचिन प्रमोद सिंह

संशयित व्यवस्थापक सचिन प्रमोद सिंह (२१, रा. शिरोली एमआयडीसी) व रोहन भैरवनाथ दाभोळकर (वय २३, रा. पैजारवाडी, ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून वेस्ट बंगला येथील दोन पीडित महिलांची सुटका केली. ही कारवाई सोमवारी (दि. २) रोजी केली. लॉजिंगचा मालक संजय भरत मिठारी (रा. सर्किट हॉऊसच्या पाठीमागे, ताराबाई पार्क) हा फरार आहे.


रोहन भैरवनाथ दाभोळकर

अधिक माहिती अशी, शिरोली एमआयडीसी येथील अभिषेक लॉजिंगवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली. त्यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या प्रमुख प्रियांका शेळके यांना कारवाईचे आदेश दिले.

त्यानुसार दि. २ जुलै रोजी कॉन्स्टेबल आनंदराव गोडसे, रवींद्र गायकवाड, आनंदा पाटील, किशोर पाटील, वैशाली पिसे, शीतल लाड यांनी लॉजिंगवर छापा टाकला असता वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले. याप्रकरणी व्यवस्थापक सचिन सिंह, एजंट रोहन दाभोळकर यांच्यासह वेस्ट बंगाल येथील दोन महिलांना ताब्यात घेतले. संशयितांच्या ताब्यातून रोख रक्कम, मोबाईल असा सुमारे आठ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
 

 

Web Title: Kolhapur: The raid on Shirala, two arrested and two afflicted women were released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.