कोल्हापूर : मटका अड्ड्यावर छापे, दोघा एजंटांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 11:40 AM2018-07-28T11:40:20+5:302018-07-28T11:57:21+5:30

कोल्हापूर येथील उमा टॉकीज परिसरातील ओढ्यावरील गणपती मंदिराच्या पाठीमागे व राजारामपुरी नऊ नंबर शाळेच्या परिसरात राजरोस सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी छापे टाकून दोघा एजंटांना अटक केली.

Kolhapur: On raids at the Matka station, two agents arrested | कोल्हापूर : मटका अड्ड्यावर छापे, दोघा एजंटांना अटक

कोल्हापूर : मटका अड्ड्यावर छापे, दोघा एजंटांना अटक

ठळक मुद्दे मटका अड्ड्यावर छापे, दोघा एजंटांना अटकबुकीमालक फरार

कोल्हापूर : येथील उमा टॉकीज परिसरातील ओढ्यावरील गणपती मंदिराच्या पाठीमागे व राजारामपुरी नऊ नंबर शाळेच्या परिसरात राजरोस सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी छापे टाकून दोघा एजंटांना अटक केली.

संशयित अजित महादेव चौगुले

संशयित साईकुणाल सुनील जाधव (वय २४, रा. पुष्पराज अपार्टमेंट, उमा टॉकीज परिसर, कोल्हापूर), अजित महादेव चौगुले (२०, रा. दत्तमंदिर रोड, राजेंद्रनगर) अशी त्यांची नावे आहेत.

ओढ्यावरील गणपती मंदिराच्या पाठीमागे एका बोळात टाकलेल्या छाप्यात साईकुणाल जाधव हा मटका घेताना आढळून आला. बुकीमालक राजू बन्ने (रा. शिवाजी पेठ) हा फरार आहे. येथून मटक्याच्या चिठ्ठ्या व रोख २३५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

राजारामपुरी नऊ नंबर शाळेच्या परिसरात अजित चौगुले मटका घेताना मिळून आला. येथून पोलिसांनी १३५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बुकीमालक नितीन कांबळे (रा. राजेंद्रनगर) हा फरार आहे. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 

Web Title: Kolhapur: On raids at the Matka station, two agents arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.