कोल्हापूर : पावसाचा अवकाळी धिंगाणा!

By admin | Published: March 2, 2015 12:28 AM2015-03-02T00:28:56+5:302015-03-02T00:29:11+5:30

कोट्यवधींचे नुकसान : साखर कारखाने, भाजीपाल्याला फटका; वीज नसल्याने दिवसभर उद्यमनगर बंद

Kolhapur: The rainy season of rain! | कोल्हापूर : पावसाचा अवकाळी धिंगाणा!

कोल्हापूर : पावसाचा अवकाळी धिंगाणा!

Next

कोल्हापूर : गेले दोन दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्याला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. ऊस तोडणी व वाहतूक ठप्प झाल्याने साखर कारखाने, गुऱ्हाळघरे बंद पडली, तर वीज नसल्याने उद्यमनगरसह कोल्हापूर शहरातील विविध छोट्या-मोठ्या उद्योगांची चाके थंडावली. एकाच दिवसात जिल्ह्णात १३७.२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात दमदार पावसाने साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर परिणाम झाला आहे. उसाची तोडणी व वाहतूक यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली असून, त्यामुळे कारखान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ढगाळ हवामान व पाऊस यामुळे उसाची रिकव्हरी कमी पडणार असल्याने त्याचा फटकाही कारखान्यांना बसणार आहे. ढगाळ हवामान व पावसाचा मोठा फटका भाजीपाल्याला बसला आहे. वेलवर्गीय पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. काढणीस आलेल्या गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गुऱ्हाळघरांचा हंगामही अंतिम टप्प्यात आहे. अचानक आलेल्या पावसाने गुऱ्हाळमालकांची चांगलीच तारांबळ उडाली. उसाच्या तोडण्या थांबल्या, जळण भिजले आहे. त्यातच खराब हवामानामुळे गुळाच्या रंगावर परिणाम झाल्याने गुऱ्हाळमालकांचे मोठे नुकसान झाले आहे. खराब हवामानाचा आंब्यासह इतर फळांच्या मोहरावर परिणाम झाला आहे. या पावसाचा फटका वीट व्यावसायिकांनाही बसला. शिवाजी विद्यापीठाजवळील फीडरमध्ये बिघाड झाल्याने शहराच्या बहुतांशी भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यातच कऱ्हाडहून येणाऱ्या ३३ केव्हीच्या उच्चदाबाच्या वाहिनीलाही मोठा बिघाड झाल्याने शहराच्या बहुतांशी भागांसह इचलकरंजी येथीलही वीजपुरवठा खंडित झाला. काम रविवारी दुपारपर्यंत सुरू होते. दुपारी चार वाजल्यापासून मध्यवर्ती बसस्थानक परिसरवगळता अन्य भागांतील वीजपुरवठा सुरळीत करण्यात ‘महावितरण’ला यश आले होते.


मुसळधार पावसाचा इशारा
येत्या ४८ तासांत राज्यात विविध भागांत मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. विदर्भात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस, कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.



मुसळधार पावसाचा इशारा
येत्या ४८ तासांत राज्यात विविध भागांत मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. विदर्भात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस, कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

Web Title: Kolhapur: The rainy season of rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.