कोल्हापूर : वृध्देच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 02:49 PM2018-02-24T14:49:31+5:302018-02-24T14:51:14+5:30

राजमौनी अपार्टमेंट, टाकाळा चौक येथे वृध्देच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन दोघा चोरट्यांनी हातोहात हिसडा मारुन लंपास केली. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.

Kolhapur: Rajamuni Apartment, at takala Chowk, and a half-neck chain of elderly necklace, looted the two thieves. The incident took place around 10pm on Thursday night. | कोल्हापूर : वृध्देच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन लंपास

कोल्हापूर : वृध्देच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन लंपास

Next
ठळक मुद्देवृध्देच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन लंपास दोघा तरुणांने जबरदस्तीने हिसडा मारुन केली चेन लंपास

कोल्हापूर : राजमौनी अपार्टमेंट, टाकाळा चौक येथे वृध्देच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन दोघा चोरट्यांनी हातोहात हिसडा मारुन लंपास केली. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.

अधिक माहिती अशी, श्रीमती कुमोदीनी जयकुमार बागी (वय ७५) ह्या गुरुवारी (दि. २२) नातेवाईकाच्या घरी गेल्या होत्या. तेथून रात्री रिक्षातून त्या आपल्या टाकाळा येथील घरी आल्या. घराच्या प्रवेशद्वाराजवळ जाताच पाठिमागून आलेल्या दोघा तरुणांपैकी एकाने येथे डॉक्टर कोठे राहतात अशी विचारणा केली.

बागी यांनी थांबा, घरामध्ये जावून मुलाला विचारुन सांगतो असे म्हणून त्या पुढे चालत जात असतानाच एकाने त्यांच्या गळ्यातील चेन जबरदस्तीने हिसडा मारुन घेतली. अचानक घडलेल्या या प्रकाराने त्यांनी भांबावून जात आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून मुले बाहेर आली. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी त्यांनी राजारामपूरी पोलीसांत फिर्याद दिली.
 

 

Web Title: Kolhapur: Rajamuni Apartment, at takala Chowk, and a half-neck chain of elderly necklace, looted the two thieves. The incident took place around 10pm on Thursday night.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.