कोल्हापूर राजारामपुरीत डॉल्बीची ‘सटकली’

By admin | Published: August 30, 2014 12:15 AM2014-08-30T00:15:00+5:302014-08-30T00:23:56+5:30

डोळे दीपवून सोडणारी विद्युत रोषणाई अन् डॉल्बीच्या दणदणाटामुळे मिरवणुकीला अभूतपूर्व जल्लोषाचे स्वरूप

Kolhapur Rajkampura Dolby's 'Sackali' | कोल्हापूर राजारामपुरीत डॉल्बीची ‘सटकली’

कोल्हापूर राजारामपुरीत डॉल्बीची ‘सटकली’

Next

कोल्हापूर : ‘आता माझी सटकली’, ‘लुंगी डान्स’, ‘नवरी नटली सुपारी फुटली’ या गाण्यांच्या ठेक्यांवर ताल धरत राजारामपुरी परिसरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांतील तरुणाई थिरकली. डोळे दीपवून सोडणारी विद्युत रोषणाई अन् डॉल्बीच्या दणदणाटामुळे मिरवणुकीला अभूतपूर्व जल्लोषाचे स्वरूप आले होते. पोलीस प्रशासनाने केलेल्या डॉल्बीमुक्त गणेश मिरवणुकांचे आवाहन मंडळांनी फाट्यावर बसविल्याचे चित्र होते.
राजारामपुरीतील मुख्य रस्त्यावर प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांचा जास्तीत जास्त काळ एकाच ठिकाणी थांबण्याच्या हट्टामुळे दोन तास काही मंडळे या ठिकाणी ठिय्या मारून होती. अखेर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना हाताला धरून पुढे सरकवले.
गणेश चतुर्थीनिमित्त यंदाही राजारामपुरीतील अनेक मंडळांच्या मिरवणुकीला सायंकाळी सुरुवात झाली. मिरवणुकीचा जोर रात्री साडेसहानंतर वाढू लागला. राजारामपुरीतील या मंडळांनी जनता बझार चौकाकडून मुख्य रस्त्यावर प्रवेश केला. राजारामपुरीतील एस. एफ.गु्रप, ‘ए’ बॉईज, अष्टविनायक तरुण मंडळ (शाहूनगर), हनुमान तालीम मंडळ, पॅट्रियट स्पोर्टस् (काटकर माळ), राजारामपुरी स्पोर्टस्, भगतसिंग मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, सम्राट फें्रड सर्कल, जिद्द युवक संघटना (आठवी गल्ली),पद्मराज मित्र मंडळ, न्यू फ्रेंडस सर्कल, सस्पेन्स, जय बजरंगबली मित्र मंडळ, सम्राटनगर मित्र मंडळ, पॅराडाईज मित्रमंडळ, दत्त स्पोर्टस्, अजिंक्य मित्र मंडळ, भगतसिंग तरुण मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, राजारामपुरी दुसरी गल्ली, गोकुळ फ्रेंड सर्कल, राजारामपुरी बारावी गल्ली, जगदंब मित्र मंडळ, न्यू फ्रेंडस सर्कल, एकता मित्र मंडळ, आदी मंडळांनी मिरवणुकीने गणेशमूर्ती आणल्या.
एकाच चौकात दहा मंडळे
मिरवणूक मार्गावर आपणच पुढे जाण्याच्या हट्टापायी जनता बझार चौकात दहा मंडळे डॉल्बीचा दणदणाट करीत सलग दोन तास एकाच ठिकाणी उभी होती. अखेर पोलिसांनी पुढील मंडळांना मार्गस्थ केल्यानंतर सात वाजता इतर मंडळांना मुख्य रस्त्यावर प्रवेश मिळाला.
केवळ एकच ढोल पथक
संपूर्ण मिरवणुकीमध्ये सर्व मंडळांचे डॉल्बी होते. मात्र, गोकुळ फ्रेंड सर्कल, राजारामपुरी गणेश मंडळाने पुणे येथील शौर्य ढोलपथक आपल्या गणरायाच्या स्वागतासाठी आणले होते. त्यामुळे या मिरवणुकीत केवळ एकच ढोलपथक दिसत होते. या पथकात ६० मुलींचा समावेश होता. या ढोलपथकाचा आवाज डॉल्बीच्या दणदणाटापुढे खुजा वाटत होता.
शहरातील व्यवसाय शांत
दरम्यान आज, शुक्रवारी शहरात दिवसभर पावसाची रिपरिप होती. गणेश चतुर्थीमुळे शहरवासीयांत उत्साही व भक्तिपूर्ण वातावरण होते. मात्र, सुटीमुळे शहरातील व्यवसाय शांतच राहिले. ग्रामीण भागातील ग्राहकांनी आज शहराकडे पाठ फिरविल्याने शहरातील उत्सवानिमित्त उपयोगी व्यवसाय वगळता सर्वच बाजारपेठेत बंदसदृश वातावरण होते. (प्रतिनिधी)

राजारामपुरीत डॉल्बीची ‘सटकली’
दणदणाट : रोषणाईने डोळे दीपले

या परिसरातील मंडळांच्या गणेशाचे आगमन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, या मंडळांच्या एलईडी लाईटमुळे नागरिकांना समोरचे काहीच दिसत नव्हते. त्यामुळे अनेक लहान मुले व स्त्रिया ठेच लागून पडल्या, तर डॉल्बीचा दणदणाट नागरिकांच्या काळजाचा ठोका वाढविणारा होता. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी मंडळांच्या या दणदणाटाबद्दल नाराजी व्यक्त केली.

Web Title: Kolhapur Rajkampura Dolby's 'Sackali'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.