कोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादीशी ‘स्वाभिमानी’ची आघाडी - राजू शेट्टी यांची शिरोळ येथे घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:59 AM2018-09-25T00:59:26+5:302018-09-25T01:04:01+5:30

भारतीय जनता पक्ष शिरोळ नगरपालिका निवडणुकीत सत्ता काबीज करणार, अशी वल्गना पालकमंत्र्यांनी केली आहे.

Kolhapur: Raju Shetty's call for 'Swabhimani' leadership with Congress-NCP is announced at Shirol | कोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादीशी ‘स्वाभिमानी’ची आघाडी - राजू शेट्टी यांची शिरोळ येथे घोषणा

कोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादीशी ‘स्वाभिमानी’ची आघाडी - राजू शेट्टी यांची शिरोळ येथे घोषणा

Next
ठळक मुद्देराजर्षी शाहू विकास आघाडी

शिरोळ : भारतीय जनता पक्ष शिरोळ नगरपालिका निवडणुकीत सत्ता काबीज करणार, अशी वल्गना पालकमंत्र्यांनी केली आहे. ती वल्गना केवळ फोलच ठरणार आहे. शहराच्या विकासासाठी आणि खऱ्या अर्थाने शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार जनसामान्यांत रुजविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व आरपीआय पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढविणार आहोत, अशी घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी केली.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व आरपीआय पक्ष

शिरोळ नगरपालिका निवडण]कीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाआघाडीची भूमिका जाहीर करण्यात आली. यावेळी खासदार शेट्टी बोलत होते. ते म्हणाले, राजर्षी शाहू विकास आघाडी म्हणून आम्ही दोन्ही काँग्रेस, आरपीआय व स्वाभिमानी शेतकरी संघटना ही निवडणूक लढविणार आहोत. या आघाडीकडून अमरसिंह पाटील हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील, तर लवकरच सतरा उमेदवारांची नावे आम्ही जाहीर करणार आहोत. शहरात पूर्वीपासून आघाड्यांचे राजकारण होत आले आहे. यापुढेही शाहू आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदासाठी आम्ही सक्षम उमेदवार दिला आहे. पक्ष, गट-तट बाजूला ठेवून गावच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे खा. शेट्टी म्हणाले.

शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, जातीयवादी पक्षाला रोखण्यासाठी आम्ही शिरोळ नगरपालिका निवडणुकीत एकत्र आलो आहोत. शहराच्या विकासाबरोबर येत्या पाच वर्षांत विकासाची संकल्पना घेऊन जनतेसमोर जाणार आहोत.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना नगरपालिकेची निवडणूक पूर्ण ताकतीने लढविणार आहे. पक्षाचे व नेत्यांच्या विचारांचे उमेदवार आघाडीत असतील. कर्जमाफी, नोटाबंदी व जीएसटीमुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला आहे. मतांच्या रूपातून परिवर्तन घडणार आहे.

यावेळी दरगू गावडे, बाबा पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. बैठकीस अमरसिंह पाटील, सावकार मादनाईक, प्रकाश पाटील-टाकवडेकर, पं. स. सभापती अर्चना चौगुले, शेखर पाटील, अशोक कोळेकर, विठ्ठल मोरे, अनंत धनवडे, मिलिंद साखरपे उपस्थित होते.

Web Title: Kolhapur: Raju Shetty's call for 'Swabhimani' leadership with Congress-NCP is announced at Shirol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.