कोल्हापूर : सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणी विरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 04:17 PM2018-08-27T16:17:09+5:302018-08-27T16:19:09+5:30

सनातन संस्थेवर बंदीची मागणी केली जात आहे. या विरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांतर्फे सोमवारी सकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढण्यात आला.

Kolhapur: A rally against the demand for ban on Sanatan Sanstha | कोल्हापूर : सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणी विरोधात मोर्चा

सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणी विरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांतर्फे सोमवारी कोल्हाूपर शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढण्यात आला.(छाया : आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्देसनातन संस्थेवरील बंदीच्या मागणी विरोधात मोर्चासमस्त हिंदुत्ववादी संघटनांतर्फे आयोजन

कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणी काही हिंदुत्वनिष्ठांना अटक करण्यात आली, याप्रकरणी पुरोगामी आणि राजकीय पक्षांकडून सनातन संस्थेवर बंदीची मागणी केली जात आहे. या विरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांतर्फे सोमवारी सकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढण्यात आला.

मिरजक तिकटी येथून मार्चास प्रारंभ झाला. जय श्रीराम, हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी, आम्ही सारे सनातन, जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच ‘सत्याची बाजू आम्ही नेहमीच मांडू’, ‘आम्ही सारे हिंदू’ असे फलक हातामध्ये घेऊन भर पावसात मोठ्या प्रमाणात महिला, मुले या मोर्चामध्ये सहभागी झाली होती.

बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महानगरपालिका, लुगडी ओळ, महाराणा प्रताप चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक मार्गे मिरजक तिकटी येथे मोर्चाची सांगता झाली.

यावेळी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्ह्याचे समन्वयक किरण दुसे, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शरद माळी, बजरंगदलाचे संभाजी साळोखे यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी बजरंगदलाचे महेश उरसाल, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, धर्माजी सायनेकर, दिलीप भिवटे, राजेंद्र सूर्यवंशी, सुनील पाटील, शरद माळी, किरण कुलकर्णी, अशोक रामचंदाणी, गजानन भुर्के, सुरेखा काकडे, साधना गोडसे, आदी उपस्थित होते.

 

 

Web Title: Kolhapur: A rally against the demand for ban on Sanatan Sanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.