लसीकरणात कोल्हापूर चौथ्या स्थानावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:27 AM2021-04-28T04:27:09+5:302021-04-28T04:27:09+5:30
(पालकमंत्री पाटील यांचा फोटो वापरावा) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात कोल्हापूर जिल्हा राज्यात चौथ्या स्थानावर आहे. ...
(पालकमंत्री पाटील यांचा फोटो वापरावा)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात कोल्हापूर जिल्हा राज्यात चौथ्या स्थानावर आहे. जिल्ह्यात आजवर नऊ लाख १९ हजार ८०३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कोल्हापूरच्या आधी मुंबई, पुणे आणि ठाणे या जिल्ह्यांचा नंबर लागतो. लसींचा तुटवडा असताना केलेल्या या उच्चांकी लसीकरणाबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.
राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झाली. तेव्हापासून कोल्हापुरात लसीकरण केले जात आहे. सुरुवातीला गैरसमजामुळे या मोहिमेला आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. नंतर मात्र लसीकरणाने वेग घेतला. गेल्या काही दिवसांत सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता लसीकरण केंद्रांवर मोठ्या रांगा लागत आहेत. दुसरीकडे लसींचा तुटवडा आहे. या अडचणींचा सामना करत कोल्हापूरने लसीकरणात राज्यात चौथ्या क्रमांकावर आघाडी घेतली आहे. केंद्राकडून होणारा लसीचा मर्यादित पुरवठा लक्षात घेता ही कामगिरी कौतुकास्पद आहे. ही फक्त सुरुवात आहे. लवकरच १०० टक्के लसीकरण करून आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे, अशा शब्दांत मंत्री पाटील यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.
--
टॉप पाच जिल्हे
जिल्हा : झालेले लसीकरण
मुंबई : २३ लाख ४८ हजार २४० (१९ टक्के)
पुणे : २१ लाख ४९ हजार २८२ (२३ टक्के)
ठाणे : ११ लाख ४७ हजार ६६१ (१० टक्के)
कोल्हापूर : ९ लाख १९ हजार ८०३ (२४ टक्के)
नागपूर : ९ लाख १४ हजार २८० (२० टक्के)
--