कोल्हापूर : नेमीनाथ दिंगबरजैन मंदिरतर्फे रथोत्सव, मोठ्या संख्येने श्रावक - श्राविका सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 03:06 PM2018-09-17T15:06:15+5:302018-09-17T15:08:32+5:30
नेमीनाथ दिंगबर जैन मंदिरतर्फे भगवान पुष्पदंत तीर्थनकार जयंती निमित्ती प्रतिवर्षी प्रमाणे शहरातील प्रमुख मार्गावर भव्य रथोत्सव काढण्यात आला. प्रमुख मार्गावर काढण्यात आलेल्या रथोत्सवात अनेक श्रावक-श्राविका सहभागी झाल्या होत्या.
कोल्हापूर : नेमीनाथ दिंगबर जैन मंदिरतर्फे भगवान पुष्पदंत तीर्थनकार जयंती निमित्ती प्रतिवर्षी प्रमाणे शहरातील प्रमुख मार्गावर भव्य रथोत्सव काढण्यात आला. प्रमुख मार्गावर काढण्यात आलेल्या रथोत्सवात अनेक श्रावक-श्राविका सहभागी झाल्या होत्या.
शाहूपुरीतील पहिली गल्ली येथील जैन मंदिरा पासून सकाळी या रथोत्सवास प्रारंभ झाला. रथोत्सवातील पालखीमध्ये भगवान पुष्पदंत तीर्थनकार यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती, तसेच रावसाहेब पाटील कुटूंबियांना रथात बसविण्याचा मान देण्यात आले होते. रथोत्सवाचांच्या आग्रभागी घोडे, बैलगाडीसह महिलांचे झांजपथक होते. त्या पाठापोठ ढोल - ताशांचे पथक होते.
शाहूपुरी व्यापारी पेठ, बी. टी. कॉलेज, शाहूपुरी तिसरी गल्ली, विनायक बंगला, व्हिनस कॉर्नर, पहिली गल्ली, व्यापार पेठ मार्ग मंदिर येथे रथोत्सवाची सांगता झाली. या ठिकाणी धार्मिक विधी झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी परिवहन संभापती राहुल चव्हाण, माजी नगरसेवक दिलीप शेटे, मंदिराचे ट्रस्टी सुभाष चौगुले, महावीर देसाई, महावीर रोटे, अध्यक्ष प्रफुल्ल चमके, उपाध्यक्ष रावासाहेब देशपांडे, सेक्रेटरी संजय शेटे, सुरेश रोटे यांच्यासह पदाधिकारी व श्रावक - श्राविका मोठया संख्येने उपस्थित होते.