कोल्हापूर : रेशनकार्डधारकाला तूरडाळ विक्री सुरु, प्रति किलो ५५ रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:17 PM2018-05-16T15:17:30+5:302018-05-16T15:17:30+5:30
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून साडेपाच लाख अन्न सुरक्षा योजनेतील रेशनकार्डधारकांना बुधवारपासून तूरडाळीची विक्री सुरू करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे १५९२ रेशनदुकानांचा समावेश आहे.
कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून साडेपाच लाख अन्न सुरक्षा योजनेतील रेशनकार्डधारकांना बुधवारपासून तूरडाळीची विक्री सुरू करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे १५९२ रेशनदुकानांचा समावेश आहे.
बाजारपेठेत सर्वसाधारण ६० ते ६५ रुपये तूरडाळीचा दर असताना रेशन दुकानामध्ये प्रत्येक किलोची पाकिटे तयार करुन ती ५५ रुपये प्रतिकिलो भावाने विक्री सुरु करण्यात आली.
जिल्'ासाठी मे महिन्यातील २ हजार ९०० क्विंटल तर कोल्हापूर शहरासाठी २०० क्विंटल तूरडाळ जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाली आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून चलनाद्वारे रेशन दुकानदारांकडून तूरडाळीचे पैसे भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पैसे भरून घेतल्यानंतर दुकानदारांना द्वारपोच योजनेद्वारे तूरडाळ पोहोच केली जात आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार दुकानदाराकडून पैसे जमा केले जात आहेत, त्याप्रमाणे इतर धान्यासह तूरडाळ द्वारपोच योजनेद्वारे दुकानदाराला पाठवली जात आहे. शहरासह जिल्ह्यातील बहुतांशी रेशन दुकानामध्ये तूरडाळ पोहचली आहे.
विशेष म्हणजे, केशरी रेशनकार्डधारकांसह सर्वच रेशनकार्ड धारकांनाही मागणीप्रमाणे व बाजारभावापेक्षा किमान ५ ते १० रुपये कमी दराने ही तूरडाळ देण्यात येणार आहे. त्यामुळे रेशनकार्डधारकांना तूरडाळ मिळत असल्याचे समजल्यानंतर रेशनदुकानात तूरडाळ खरेदीसाठी गर्दी होत आहे.