कोल्हापूर-रत्नागिरी मार्गास गती मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:35 AM2018-07-02T00:35:49+5:302018-07-02T00:35:57+5:30
तानाजी पोवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूृर : कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या रत्नागिरी-सोलापूर ते नागपूर या राष्टÑीय महामार्गाची आखणी यापूर्वीच पूर्ण झाली असतानाही भूसंपादनाची प्रक्रिया अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे.
मार्चमध्ये होणाºया भूसंपादनासाठी जुलै महिना उजाडला. आता कुठे या भूसंपादनाच्या नोटिसा बजावण्यात राष्टÑीय महामार्ग विभागाचे अधिकारी व्यस्त आहेत. या १६६ नंबरच्या रस्त्याचे संपूर्ण काँक्रीटीकरण करण्यात येणार असून कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाºया या सुमारे ७० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांतील सुमारे १७ गावांतील ३२५ जणांना नोटिसा बजावल्याने शेतकºयांत खळबळ माजली आहे.
या राष्टÑीय महामार्गामुळे कोकण आता सोलापूरसारख्या दुष्काळी भागाच्या टप्प्यात येणार आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर, मिरज, सांगोला ते सोलापूर असे सुमारे ३७० किलोमीटर सुमारे तीन हजार कोटी रुपये या मार्गासाठी खर्च करण्यात येणार आहेत. गेल्या दहा वर्षांत कोकणाशी दळणवळण वाढल्याने या मार्गावर प्रचंड वाहतूक वाढली आहे.
या राष्टÑीय महामार्गांतर्गत कोल्हापूर ते रत्नागिरी असा चौपदरी रस्ता करण्यात येणार आहे. तो संपूर्णपणे काँक्रीटचा आहे. पहिल्या टप्प्यातील कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा रस्ता हा शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले तालुुक्यातून जाणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यांतील भूसंपादन करण्यात येणार आहे. या महामार्गाची आखणी पूर्ण झाली असताना भूसंपादनासाठी काही शेतकºयांनी विरोध दर्शविला.
जिल्ह्यातून जाणाºया सुमारे ७० किलोमीटर मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया मार्च महिन्यात सुरू होणे आवश्यक असताना त्याला अपेक्षित गती मिळालेली नाही. त्या प्रक्रियेला आता पुन्हा प्रारंभ झाला असून, पहिल्या टप्प्यातील आंबा ते पैजारवाडी या भूसंपादनामध्ये सुमारे १७ गावांतील ३२६ जणांना धडाधड नोटिसा गेल्याने आता शेतकºयांत खळबळ उडाली आहे.
या भूसंपादनास हरकत असणाºयांनी लेखी स्वरूपात तक्रारी पुराव्यांनिशी सक्षम प्राधिकरण अथवा भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकाºयांकडे द्याव्यात, असे आवाहन केले आहे. त्यानंतर पैजारवाडी (ता. पन्हाळा) ते चोकाक (ता. हातकणंगले) अशा १७ गावांचे भूसंपादन होणार आहे.
पहिल्या टप्प्यात या गावांचा समावेश
कोल्हापूर जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया किमान चार महिने उशिरा करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात आंबा ते पैजारवाडी या दरम्यानच्या शाहूवाडी तालुक्यातील चांदोली, गोगवे,
करंजोशी, केर्ले (ता. शाहूवाडी), खुटाळवाडी, निळे, ठमकेवाडी, वालूर, येलूर येथील तसेच पन्हाळा तालुक्यातील आवळी, बोरपाडळे, दानेवाडी, देवाळे, नावली, पैजारवाडी, नेबापूर, पिंपळे-सातवे या गावांतील शेतजमिनींचा समावेश आहे.
दोन टप्प्यांत भूसंपादन
शाहूवाडी तालुक्यातील आंबा ते पैजारवाडी (ता. पन्हाळा) हे भूसंपादन एका टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यानंतर पन्हाळा ते चोकाक (ता. हातकणंगले) अशी दुसºया टप्प्यातील भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. अशा सुमारे ७० किलोमीटर लांबीच्या रस्त्यामध्ये सुमारे ५० गावांतील भूसंपादन केले जाणार आहे.
रत्नागिरी-सोलापूर ते नागपूर या राष्टÑीय महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाºया रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादनाची प्रकिया मार्चमध्ये राबविणे अपेक्षित होते; पण शेतकºयांच्या विरोधामुळे ही प्रक्रिया उशिरा सुरू झाली आहे.
- बी. एम. साळुंके, प्रकल्प संचालक, राष्टÑीय महामार्ग