कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’ची नोंदणी धुमधडाक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:38 AM2018-12-11T10:38:48+5:302018-12-11T10:51:27+5:30
‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वासाठी धूमधडाक्यात नोंदणी सुरू झाली आहे. यंदा ‘व्हिंटोजिनो प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्डबाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’चा थरार कोल्हापुरात ६ जानेवारी २०१९ ला रंगणार आहे. या मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि. २० डिसेंबरपर्यंत आहे.
कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वासाठी धूमधडाक्यात नोंदणी सुरू झाली आहे. यंदा ‘व्हिंटोजिनो प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्डबाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’चा थरार कोल्हापुरात ६ जानेवारी २०१९ ला रंगणार आहे. या मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि. २० डिसेंबरपर्यंत आहे.
कोल्हापुरात गेल्यावर्षी ‘लोकमत महामॅरेथॉन’ला उदंड प्रतिसाद लाभला. आबालवृद्ध तंदुरूस्त राहावेत या हेतूने यावर्षी आयोजित केलेली ही महामॅरेथॉन फन रन (१२ वर्षांपेक्षा जास्त, धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी) १० किलोमीटरची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ किलोमीटर (१८ पेक्षा जास्त) असणार आहे.
त्यात फॅमिली रन ३ किलोमीटर अंतराची असणार आहे. ती सर्वच वयोगटांसाठी खुली असणार आहे. त्याचप्रमाणे लष्कर,पोलीस दलातील धावपटूंसाठी वेगळा गट ठेवला आहे.
विदेशातील स्पर्धेकांना देखील या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. या महामॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर (रोहन भोसले) ९६०४६४४४९४, ९८८१८६७६०० वर नोंदणी करता येणार आहे.
शारिरीक तंदुरूस्तीबाबत जनजागृती आणि सजग करणारा ‘लोकमत महामॅरेथॉन’चा उपक्रम उल्लेखनीय आहे. चालणे, धावणे हा व्यायाम शारीरिक तंदुरूस्तीसाठी आवश्यक आहे. त्यासाठी मॅरेथॉनसारख्या उपक्रमांतून प्रेरणा, आत्मविश्वास मिळतो. त्यामुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी होणे उपयुक्त ठरणारे आहे.
-संजय शिंदे,
निवासी उपजिल्हाधिकारी
‘लोकमत महामॅरेथॉन’चे नियोजन, व्यवस्थापन अचूक असते. धावपटू, नवोदित धावपटू यांच्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असतात. ‘लोकमत’च्या प्रत्येक महामॅरेथॉनमध्ये मी सहभागी होतो. फिटनेस चांगला राहण्यासाठी धावणे हा व्यायाम महत्त्वाचा आहे. कोल्हापुरातील यावर्षीच्या महामॅरेथॉनमध्ये मी, तर सहभागी होणारच आहे. तुम्हीदेखील सहभागी व्हा.
-क्षितीज बेलापूरे,
आयर्न मॅन, कऱ्हाड .
अल्प शुल्कात बक्षिसांची लयलूट
प्रकार शुल्क (अर्ली बर्ड शुल्क) मिळणारे साहित्य
३ कि.मी. ४०० रु. ४०० रु. टी-शर्ट गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
५ कि.मी. ६०० रु. ४९० रु. टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
१० कि.मी. १२०० रु. ११०० रु. टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
२१ कि.मी १२०० रु. ११०० रु. टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
२१ कि.मी. १,००० रु. १,००० रु. टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट