कोल्हापूर : रॉकेल फेरीवाल्यांचे पुनर्वसन करा : जनविकास स्वाभिमानी सेवाभावी संस्थेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 04:28 PM2018-12-24T16:28:39+5:302018-12-24T16:30:14+5:30
रॉकेल फेरीवाल्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने रॉकेलचा कोटा बंद केला आहे. यामुळे फेरीवाल्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे; त्यामुळे पुढील निर्णय होईपर्यंत किमान एक महिन्याची मुदतवाढ देऊन रॉकेलचा कोटा पूर्ववत सुरू ठेवावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा जनविकास स्वाभिमानी सेवाभावी संस्थेतर्फे सोमवारी देण्यात आला.
कोल्हापूर : रॉकेल फेरीवाल्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने रॉकेलचा कोटा बंद केला आहे. यामुळे फेरीवाल्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे; त्यामुळे पुढील निर्णय होईपर्यंत किमान एक महिन्याची मुदतवाढ देऊन रॉकेलचा कोटा पूर्ववत सुरू ठेवावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा जनविकास स्वाभिमानी सेवाभावी संस्थेतर्फे सोमवारी देण्यात आला.
याबाबतचे निवेदन अध्यक्ष मोहन पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला दिले. यामध्ये रॉकेल फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी पर्यायासंदर्भात आॅनलाईनद्वारे अर्ज भरण्याची मुदत २४ डिसेंबर २०१८ अशी आहे.
बहुतांश फेरीवाल्यांना शासनाचा निर्णय समजलेला नाही व यासाठीची मुदतही संपली आहे; त्यामुळे प्रशासनाने यासाठी किमान एक महिन्याची मुदतवाढ द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.
शिष्टमंडळात गोविंद माने, निवृत्ती पोवार, दिनकर जाधव, नामदेव नलवडे, अनिल कांबळे, इंदूबाई मस्के, मधुकर पाटील, वत्सला कांबळे, आदींचा समावेश होता.