नागरिकांच्या बचावासाठी धावली कोल्हापूर रेस्क्यू टीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:21 AM2021-07-25T04:21:52+5:302021-07-25T04:21:52+5:30
कोल्हापूर : महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी एनडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांसोबतच कोल्हापूर रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते गेल्या दोन दिवसांपासून झटत आहेत. ...
कोल्हापूर : महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी एनडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांसोबतच कोल्हापूर रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते गेल्या दोन दिवसांपासून झटत आहेत. या कालावधीत कोल्हापूर शहर व चिखली आंबेवाडीतील २ हजार नागरिकांना टीमने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
पुराच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत, त्यांच्या बचावासाठी एनडीआरएफ व आपत्ती व्यवस्थापनचे जवान झटत आहेत, त्यांच्या बरोबरीने सागर बगाडे यांच्या कोल्हापूर रेस्क्यू टीमचे कार्यकर्तेही या बचावकार्यात गुंतले आहेत. शुक्रवारी नागाळा पार्क, महावीर गार्डन , बसंत बहार टॉकीज रोड, खानविलकर पंप, महावीर कॉलेज, न्यू पॅलेस, रमन मळा, शाहुपुरी, राजारामपुरी, पंचगंगा हॉस्पिटल, शिवाजी पूल, आंबेवाडी, मुक्त सैनिक वसाहत येथील १२०० नागरिकांना पूरग्रस्त भागातून सुरक्षित बाहेर पडण्यास मदत करण्यात आली तर शनिवारी शिवाजी पूल, आंबेवाडी, प्रयाग चिखली, वडणगे, वरणगे या भागात रेस्क्यू मोहीम राबवली. यामध्ये किमान ७३० लोकांना पूरग्रस्त भागातून सुरक्षित बाहेर पडण्यास मदत केली. शिवाजी पूल, आंबेवाडी, प्रयाग चिखली, वडणगे, वरणगे या भागातून साडेसातशे लोकांना पूरग्रस्त भागातून सुरक्षित बाहेर पडण्यास मदत केली. या मोहिमेत सागर बगाडे, निशांत गोंधळी, सागर वसुदेवन, अविराज गवस, अमोल गुरव, सारंग माने, अशांत मोरे, प्रवीण नाचणेकर, प्रथमेश कांबळे,जाई देवाणावर, अक्षय भिडे, मुनिर शेख, ऐश्वर्या मुनींश्वर, अभिषेक धर्माधिकारी, चंद्रकांत यादव, आरती कोळी, दुर्वांकुर देवळेकर, केदार खराडे, शुभम गायकवाड, राजेंद्र बनसोडे यांनी सहभाग घेतला होता.
--
फोटो कोलडेस्कवर कोल्हापूर रेस्क्यू टीम नावाने
ओळ : कोल्हापुरातील पूरग्रस्त नागरिकांच्या बचावासाठी कोल्हापूर रेस्क्यू टीमने पुढाकार घेतला आहे.
---