कोल्हापूर : मल्लांचे मानधन पुन्हा रखडले, केवळ ‘लवकर देऊ’ इतकीच ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 06:14 PM2018-12-04T18:14:44+5:302018-12-04T18:17:19+5:30
राज्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी मल्लांचे मानधन पुन्हा रखडले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून त्यांना ते मिळालेले नाही. या मानधनाच्या प्रतिक्षेत त्यांची दिवाळी सरली. याबाबत चौकशी करणाऱ्या ज्येष्ठ मल्लांना केवळ ‘लवकर देऊ’ इतकीच ग्वाही दिली जात आहे.
ठळक मुद्देहिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी मल्लांचे मानधन पुन्हा रखडलेआठ महिन्यांपासून प्रतीक्षा; शासनाचे दुर्लक्ष
कोल्हापूर : राज्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी मल्लांचे मानधन पुन्हा रखडले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून त्यांना ते मिळालेले नाही. या मानधनाच्या प्रतिक्षेत त्यांची दिवाळी सरली. याबाबत चौकशी करणाऱ्या ज्येष्ठ मल्लांना केवळ ‘लवकर देऊ’ इतकीच ग्वाही दिली जात आहे.
कुस्तीमध्ये देशासह राज्याचे नावलौकीक केलेल्या सात हिंदकेसरी आणि सुमारे ३0 महाराष्ट्र केसरी मल्लांना राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून दरमहा सहा हजार रुपयांचे मानधन दिले जाते; त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील १९ मल्ल पात्र आहेत; मात्र, या मल्लांना मानधनासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत आहे.