ढगांच्या लपडावात कोल्हापूरकरांनी अनुभवला सूर्यग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 04:25 PM2020-06-21T16:25:29+5:302020-06-21T16:28:39+5:30
कोल्हापूर : वीसशेवीसमधील पहिले व एकुणातील तिसऱ्या ग्रहणाचा अनुुुभाव रविवारी करवीरवासीयानी ढगाळ वातावरणात आणि ढगााच्या लपंडावाात घेतला. एवढे स्वच्छ व निर्मळ हवा राहील ...
कोल्हापूर : वीसशेवीसमधील पहिले व एकुणातील तिसऱ्या ग्रहणाचा अनुुुभाव रविवारी करवीरवासीयानी ढगाळ वातावरणात आणि ढगााच्या लपंडावाात घेतला.
एवढे स्वच्छ व निर्मळ हवा राहील अशी अपेक्षा नव्हती. पण ढगांच्या लपंडावात सूर्यग्रहण अनुभवता आले हेही नसे थोडके. आज २१ जून, आंतरराष्ट्रीय योग दिवसही होतत. आज मोठा दिवस आणि उद्यापासून दक्षिणायन सुरु होणार आहे.
अमावस्येला चंद्र दर्शन कधीच होत नाही, पण सूर्य ग्रहणा दिवशी मात्र पूर्ण नाही पण करवीरकरांना मात्र ६० टक्के चंद्राचे दर्शन झाले तर कुरुक्षेत्र आणि कंकणाकृतीच्या पट्ट्यात संपूर्ण चंद्र सर्वांना पाहता आला.
सूर्यग्रहणावेळी आपण आणि सूर्य यांच्यामध्ये नेहमी चंद्र येतो आणि त्यामुळे सूर्यग्रहण होतं. आज संपूर्ण भारतातून सूर्यग्रहण दिसलं पण कुरुक्षेत्राच्या पट्ट्यात कंकणाकृती होतं तर त्याच्या उत्तरेला आणि त्याच्या दक्षिणेला सूर्यग्रहणाचा खंडग्रास पणा दिसून आला.
सकाळी दहाच्या सुमारास चंद्र पूर्वेकडून सूर्या बिंबावर घड्याळातील अकराच्या आसपास येऊ लागला, नंतर तो पश्चिमेकडे सरकत असताना खाली खाली येतो असा दिसला. बरोबर साडेअकरा वाजता कोल्हापुरातील ग्रहण सर्वात जास्त होतं, पण कुरूक्षेत्रावर बारा वाजता फक्त एक मिनिटासाठी कंकणाकृती बांगडी तयार झाली होती.
त्याठिकाणीही जाण्याची अनेक खगोल प्रेमींना इच्छा असूूूनही लाँकडाऊनमुळे जाता आलं नाही. त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवावी लागली.
कंकणाकृती ऐवजी खंडग्रास ग्रहण पाहण्याचा योग आला. यापुढील १४ डिसेंबरला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, पण यापुढील कंकणाकृती ग्रहण २१ मे २०३१ रोजी दक्षिण भारतात दिसणार आहे आणि महाराष्ट्रातील जनतेला कंकणाकृती योग मात्र या शतकाऐवजी एकविसाव्या शतकात ३ नोव्हेंबर २१०४ रोजी होण्याचा होरा आहे.
मध्यानंतर दुपारी एक वाजून 28 मिनिटांनी घड्याळाच्या सहा वाजायच्या स्थितीत चंद्र-सूर्य वरून निघून गेला आणि ग्रहण संपले. आषाढात येणाऱ्या पोर्णिमेला ्गु्रु्् चंद्र ग्रहण होणार आहे.
-(डॉ. राजेंद्र भस्मे, कोल्हापूर)