कोल्हापूरकरांना लागतात दिवसाला दहा टन लिंबू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:24 AM2021-04-08T04:24:49+5:302021-04-08T04:24:49+5:30
कोल्हापूर : पुन्हा कोरोनाचा कहर वाढू लागल्यानंतर रुग्ण बरे होण्यासाठी लागणारे ‘क’ जीवनसत्त्व लिंबू आणि मोसंबी या लिंबू वर्गीय ...
कोल्हापूर : पुन्हा कोरोनाचा कहर वाढू लागल्यानंतर रुग्ण बरे होण्यासाठी लागणारे ‘क’ जीवनसत्त्व
लिंबू आणि मोसंबी या लिंबू वर्गीय फळांमध्ये अधिक असते. त्यामुळे बाजारात त्याची आवक वाढू लागली आहे. दिवसाला दहा टन लिंबू, तर साडेसात टन मोसंबी कोल्हापुरात दाखल होऊ लागला आहे. आवक कमी आणि मागणी अधिक असल्याने दरही तेजीत आहे.
उन्हाळ्यात लिंबू सरबत पिल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता व तहान भागते म्हणून लिंबूला मागणी वाढते. परंतु मागील वर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला आहे. त्यात रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लिंबू रोजच्या आहारात समावेश करावा. असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. त्यामुळे लिंबूच्या मागणीत मागील वर्षी वाढ झाली होती. त्याप्रमाणे यंदाही वाढ झाली आहे. कोल्हापुरात दिवसाला दहा टन लिंबू रोज कृषी उत्पन्न बाजारात आवक होते. विशेष म्हणजे जवारी कागदी लिंबाचा हा प्रकार या भागात अधिक खपतो. त्याला रसही अधिक असतो. किरकोळ बाजारात दरही अगदी दहा रुपयाला दोन असा सुरू आहे.
कोरोनाच्या रुग्ण बरे होण्यासाठी औषधांसोबतच संत्री, मोसंबी या फळांचे सेवन करण्यासाठी डाॅक्टर सांगतात. या फळातून रुग्णाची रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि रुग्ण बरे होण्यास सहाय्य होते. त्यामुळे या फळांनाही मागणी आहे. यात संत्र्याचा हंगाम दोन महिन्यांपूर्वीच संपुष्टात आल्यामुळे ती बाजारात नाहीत. तर केवळ बीड, बार्शी, जळगाव, जालना या भागातून मोसंबी मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात येत आहेत. विशेष म्हणजे याचीही आवक वाढली असून दिवसाला साडेसात टन इतकी आवक वाढली आहे. दरही प्रतिकिलो १०० ते १५० रुपयांच्या दरम्यान आहे.
दर असे (घाऊक)
फळाचा प्रकार
फेब्रुवारी, मार्च, एप्रिल
लिंबू (१२०० नग पोते) २००० ते ४००० रु. २५५० ते ५००० रु. ३५०० ते ६००० रु.
मोसंबी (२० किलोचे पोते) १५०० ते २००० रु. १५०० ते २१०० रु. १६०० ते २५०० रु.
चौकट
कागदी जातीचा लिंबू जत, विजापूर, पंढरपूर या भागातून रोज दहा टन इतका माल कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजारात दाखल होतो. या लिंबाचा प्रती नग दर पाच रुपये इतका आहे. तर घाऊक बाजारात १२०० नगाचे पोत्याचा दर ३,५०० ते ६ हजार इतका आहे.
चौकट
कोल्हापूरच्या फळ बाजारात बीड, बार्शी, जळगाव, जालना येथून मोसंबीची आवक होते. दिवसाला ६ ते साडेसात टन इतकी आवक होते. किरकोळ बाजारात १०० ते १५० रुपये किलो असा दर आहे.
चौकट
दरात वाढ
गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत मोसंबीच्या किलोच्या दरात ३० टक्के इतकी वाढ झाली आहे. तर लिंबूच्या विक्री दरात ही दुप्पट अर्थात ४० ते ५० टक्के इतकी वाढ झाली आहे. आवक कमी झाली आणि मागणी वाढ झाली आहे. उत्पादनही घटले आहे. सर्वसाधारण हिवाळ्यानंतर हे उत्पादन अधिक प्रमाणात बाजारात येते. त्यानंतर हंगाम कमी होतो. लिंबू बारमाही पीक आहे. कोरोनाच्या काळात लिंबूचे महत्त्व वाढल्याने त्याला बारमाही मागणी होती. कहर कमी झाल्यानंतर लिंबूच्या मागणीत घट झाली होती. पुन्हा प्रार्भाव वाढल्यानंतर मागणीत वाढ झाली आणि आवक कमी झाली. लिंबूचे दरही वाढले.
प्रतिक्रिया
रोजच्या आहारात फळे खाल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते. अनेक प्रकारची व्हिटॅमिन्स मिळतात. शरीराला पोषक असे अन्नही त्यातून मिळते. त्यामुळे फळांना बारमाही मागणी असते.
नईम बागवान, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा फ्रुट सेलर असोसिएशन
कोट
कोरोना संसर्ग झालेला रुग्ण लवकर बरा होण्यासाठी व्हिटॅमिन ‘सी’ची गरज असते. त्याकरिता औषधांसोबत लिंबू सरबत, मोसंबी अशी लिंबू वर्गीय फळे रुग्णाला दिली जातात. त्यातून रोग प्रतिकारशक्ती मिळते.
डाॅ. शरद पोवार, कोल्हापूर
फोटो : ०७०४२०२१-कोल-लेमन (सर्व छाया :नसीर अत्तार)
फोटो : ०७०४२०२१-कोल-ऑरेंज