कोल्हापूर :  स्वच्छता ही सर्वांची जबाबदारी : बाचूळकर, ड्रेनेज लाईनचे भूमिपूजन, १२५ व्या शौचालयाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 07:05 PM2018-01-10T19:05:59+5:302018-01-10T19:09:10+5:30

आपण आपल्या परिसरात स्वच्छता ठेवली तर आजारांना आमंत्रण मिळणार नाही. रोगराई टळेल. महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी आले नाहीत तर स्वच्छता ही व्यक्तीचे कर्तव्य व जबाबदारी आहे, हे ओळखून आपण ती पाळली पाहिजे, असे प्रतिपादन कोल्हापूर शहरातील स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अ‍ॅम्बॅसडर डॉ. मधुकर बाचूळकर यांनी मंगळवारी (दि. ९) येथे बोलताना केले.

Kolhapur: Responsibility for cleanliness is the responsibility of all: Bachulkar, Bhumi Pujan of drainage line, 125th toilets inauguration | कोल्हापूर :  स्वच्छता ही सर्वांची जबाबदारी : बाचूळकर, ड्रेनेज लाईनचे भूमिपूजन, १२५ व्या शौचालयाचे उद्घाटन

कोल्हापूर शहरातील स्वच्छता अभियानाचे अ‍ॅम्बॅसडर डॉ. मधुकर बाचूळकर यांनी यादवनगर येथील ‘स्वच्छ गल्ली, सुंदर गल्ली’ स्पर्धेत सहभागी झालेल्या गल्ल्यांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी माजी उपमहापौर शमा मुल्ला, विराज कोप, अनंत पाटणकर उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्दे कोल्हापूर शहरात घरोघरी शौचालय प्रकल्पाचे अनावरणकोल्हापूर महानगरपालिका, शेल्टर असोसिएट्स स्वयंसेवी संस्थेमार्फत प्रकल्प डॉ. मधुकर बाचूळकर कोल्हापूर शहरातील स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अ‍ॅम्बॅसडर‘माझी गल्ली, सुंदर गल्ली’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : आपण आपल्या परिसरात स्वच्छता ठेवली तर आजारांना आमंत्रण मिळणार नाही. रोगराई टळेल. महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी आले नाहीत तर स्वच्छता ही व्यक्तीचे कर्तव्य व जबाबदारी आहे, हे ओळखून आपण ती पाळली पाहिजे, असे प्रतिपादन कोल्हापूर शहरातील स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अ‍ॅम्बॅसडर डॉ. मधुकर बाचूळकर यांनी मंगळवारी (दि. ९) येथे बोलताना केले.

कोल्हापूर महानगरपालिका आणि शेल्टर असोसिएट्स या सामाजिक स्वयंसेवी संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या घरोघरी शौचालय प्रकल्पाच्या अनावरणप्रसंगी बाचूळकर बोलत होते. यादवनगर येथे मंगळवारी ड्रेनेज  लाईनचे भूमिपूजन माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्या हस्ते तसेच वस्तीतील १२५ व्या शौचालयाचे उद्घाटन बाचूळकर यांच्या हस्ते झाले.

सध्या वस्तीत सुरू असलेल्या ‘स्वच्छ गल्ली, सुंदर गल्ली’ स्पर्धेत सहभागी झालेल्या गल्ल्यांना त्यांनी भेट दिली.
परिसरातील रहिवाशांनी कोल्हापूर शहराचा परिसर स्वच्छ ठेवून ‘माझी गल्ली, सुंदर गल्ली’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छतेचा संदेश व आदर्श निर्माण करून दिला आहे.

या कार्यक्रमास पर्यावरण अधिकारी विराज कोप, स्वच्छता निरीक्षक अनंत पाटणकर, संजय कवाळे, कंत्राटदार कोल्हेकर व शेल्टर संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

 

Web Title: Kolhapur: Responsibility for cleanliness is the responsibility of all: Bachulkar, Bhumi Pujan of drainage line, 125th toilets inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.