कोल्हापूर :जिल्'ात पोलीस बंदोबस्तात ऊसवाहतूक- संजय मोहिते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 07:18 PM2017-11-03T19:18:20+5:302017-11-03T19:20:31+5:30
कोल्हापूर : जिल्'ात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ज्या-त्या वेळी कारखानदारांच्या मागणीनुसार पोलीस बंदोबस्तात ऊसवाहतूक केली जाईल.
कोल्हापूर : जिल्'ात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ज्या-त्या वेळी कारखानदारांच्या मागणीनुसार पोलीस बंदोबस्तात ऊसवाहतूक केली जाईल. ऊसवाहतुकीच्या वाहनांवर हल्ले, तोडफोड, जाळपोळ करणाºया आंदोलकांवर कठोर कारवाई केली जाईल. दरासंबंधीचे आंदोलन लोकशाही मार्गाने असावे, कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्'ातील पोलीस अधिकाºयांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.
जिल्'ात ऊसदरासंबंधीच्या आंदोलनास सुरुवात झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला प्रतिटन एकरकमी ३४०० रुपये दराची मागणी केली आहे. साखर कारखानदार व राज्य सरकारने याबाबत अद्याप तोडगा काढलेला नाही. राज्य सरकारने गुरुवारी (दि. २) मुंबईत घेतलेली बैठकही निष्फळ ठरल्याने आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे. चंदगड, शिरोळ, गडहिंग्लज या ठिकाणी आंदोलकांनी ऊस वाहतूक करणारी वाहने अडविण्याचे प्रकार केले आहेत. काही ठिकाणी शेतात जाऊन ऊसतोडणी बंद पाडली आहे.
जिल्'ातील आंदोलनाला हिंसक वळण लागून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस अधिकाºयांना सतर्क राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मोहिते यांनी शुक्रवारी झालेल्या गुन्हेविषयक बैठकीत दिले. यासंबंधी पत्रकारांनी मोहिते यांना विचारणा केली असता ते म्हणाले, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मात्र कायदा हातात घेऊन केलेले हिंसक आंदोलन खपवून घेतले जाणार नाही. आंदोलकांशी आणि साखर कारखानदारांशी चर्चा करावी. दोन्हींमध्ये समन्वय साधावा, अशा सूचना जिल्'ातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाºयांना दिल्या आहेत. गडहिंग्लज परिसरात काही आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. हिंसक आंदोलन करून वाहनधारक आणि शेतकºयांचे नुकसान करणाºयांवर गुन्हे दाखल केले जातील. कारखानदारांच्या मागणीनुसार पोलीस बंदोबस्तात ऊसवाहतूक केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.