कोल्हापुरात दि. १२ ते १४ जानेवारीला पोलो मैदानावर ‘रॉयल हॉर्स शो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 01:08 PM2018-12-24T13:08:47+5:302018-12-24T13:10:49+5:30

कोल्हापूर इक्केस्टेरियन असोसिएशन आणि आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी, पुणे आयोजित ‘दि कोल्हापूर रॉयल हॉर्स शो’चे आयोजन दि. १२ ते १४ जानेवारी या कालावधीत पोलो मैदान येथे केले आहे. या स्पर्धेेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रसह बंगलोर येथील स्पर्धक सहभागी होत आहेत.

In Kolhapur The Royal Horse Show on the Polo grounds from January 12 to 14 | कोल्हापुरात दि. १२ ते १४ जानेवारीला पोलो मैदानावर ‘रॉयल हॉर्स शो’

कोल्हापुरात दि. १२ ते १४ जानेवारीला पोलो मैदानावर ‘रॉयल हॉर्स शो’

Next
ठळक मुद्देकोल्हापुरात दि. १२ ते १४ जानेवारीला पोलो मैदानावर ‘रॉयल हॉर्स शो’ राज्यासह बंगलोर येथून स्पर्धक सहभागी

कोल्हापूर : कोल्हापूर इक्केस्टेरियन असोसिएशन आणि आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी, पुणे आयोजित ‘दि कोल्हापूर रॉयल हॉर्स शो’चे आयोजन दि. १२ ते १४ जानेवारी या कालावधीत पोलो मैदान येथे केले आहे. या स्पर्धेेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रसह बंगलोर येथील स्पर्धक सहभागी होत आहेत.

दरम्यान, १० जानेवारी रोजी भवानी मंडप ते न्यू पॅलेस या मार्गावर सहभागी होणाऱ्या अश्वांचा ‘रोड शो’ होत आहे, अशी माहिती माजी आमदार मालोजीराजे छत्रपती व इक्केस्टेरियन असोसिएशनचे अध्यक्ष वीरेंद्र घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गतवर्षी दोन दिवसांच्या या स्पर्धेत १४ शाळांनी सहभाग दर्शवला होता. कोल्हापूर, सांगली, सातारा, अकलूज, पुणे, मुंबई, आदी शहरातील या शाळा होत्या. या स्पर्धेमध्ये १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेला अश्व शौकिनांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता.

कोल्हापूर इक्केस्टेरियन असोसिएशन आणि आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी, पुणे यांच्यावतीने ‘दि कोल्हापूर रॉयल हॉर्स शो’चे आयोजन यंदा पोलो मैदानावर होत आहे. यावर्षी आजअखेर पर्यंत ३५० स्पर्धकांनी सहभाग दर्शवला आहे.

स्पर्धेसाठी शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. इच्छुक सहभागी स्पर्धकांनी कोल्हापूर इक्केस्टेरियन असोसिएशन एस्तेर पॅटन चर्चशेजारी, जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग येथे सकाळी ११ ते ५ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन वीरेंद्र घाटगे यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेला असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत सुर्वे, सेक्रेटरी अच्युत करांडे, ऋतुराज अतिग्रे, श्रेया कामत, स्वप्निल हिडदुगे, अक्षय खोतलांडे, आदी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोल्हापुरात ट्रेनिंग सेंटरसाठी प्रयत्न

सलग दुसऱ्यांवर्षी ‘दि कोल्हापूर रॉयल हॉर्स शो’चे आयोजन केले जात आहे. यामध्ये शो जंपिंग, १० पेगिंग, जिमखाना गेम्स, अशा तीन प्रकारांत स्पर्धा होत आहे. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही साहसी गेम्स असल्याने त्याबाबत कोल्हापुरात लवकरच ट्रेनिंग सेंटर सुरू करणार असल्याची माहिती माजी आमदार मालोजीराजे यांनी दिली.
 

 

Web Title: In Kolhapur The Royal Horse Show on the Polo grounds from January 12 to 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.