कोल्हापूर : देवस्थानतर्फे २५ लाख रुपये साहाय्यता निधी, मुख्यमंत्र्यांकडे रक्कम सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:49 PM2018-11-02T12:49:17+5:302018-11-02T12:50:49+5:30
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून २५ लाख रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी देण्यात आले. पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईतील वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द करण्यात आली.
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून २५ लाख रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी देण्यात आले. पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईतील वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द करण्यात आली.
देवस्थान समितीने सन २०१८-१९ च्या अंदाजपत्रकात २ कोटी रुपये सामाजिक कार्यासाठी देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार विधि व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांशी चर्चा झाल्यानंतर समितीने पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी २५ लाख रुपये दिले. या रकमेचा धनादेश समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
यावेळी जोतिबा विकास आराखडा तसेच श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यावर विशेष चर्चा करण्यात आली. जोतिबा विकास आराखड्याच्या विकासकामांना डिसेंबरमध्ये सुरुवात होणार असून त्याच्या उद्घाटनप्रसंगी येण्याचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी सदस्या संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, बी. एन. पाटील -मुगळीकर, सचिव विजय पोवार, सहसचिव शिवाजी साळवी, आदी उपस्थित होते.