कोल्हापूर : उद्योगपतीला साडेचार लाखांचा गंडा, हॅकर्सने काढले एटीएमवरुन परस्पर पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 03:00 PM2018-10-22T15:00:33+5:302018-10-22T15:02:03+5:30
कोल्हापूर, बेळगाव येथील एटीएमवरुन हॅकर्सने परस्पर साडेचार लाख रुपये काढून उद्योगपतीची फसवणूक केलेचे रविवारी (दि. २१) उघडकीस आले. याप्रकरणी अनोळखी हॅकर्सवर राजारामपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
कोल्हापूर : कोल्हापूर, बेळगाव येथील एटीएमवरुन हॅकर्सने परस्पर साडेचार लाख रुपये काढून उद्योगपतीची फसवणूक केलेचे रविवारी (दि. २१) उघडकीस आले. याप्रकरणी अनोळखी हॅकर्सवर राजारामपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
अधिक माहिती अशी, अब्दूलकादर नजीर अहमद काझी (वय ४९, रा. शिंदे कॉलनी, सम्राटनगर) यांचा गोकुळ शिरगाव येथे कारखाना आहे. ते मूळचे बारामतीचे २०१० पासून कोल्हापूरात कुटूंबासह राहतात. त्यांचे कारखाना व वैयक्तीक आर्थिक व्यवहारांची देवाण-घेवाण बारामती येथील आयडीबीआय बँकेतून आॅनलाईनद्वारे होते. दोन दिवसापूर्वी ते चित्रपट पाहण्यासाठी गेले.
तिकीट काढलेनंतर त्यांनी एटीएमवरुन त्याचे पैसे भरले. यावेळी त्यांच्या मोबाईलवर बॅकेत बॅलेन्स किती शिल्लक आहे, त्याचा मॅसेज आला. खात्यात शिल्लक असलेल्या बॅलेन्सवरुन साडेचार लाख रुपये कमी झालेचा मॅसेज पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी राजारामपूरी येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेत जावून पासबुक भरले असता यापूर्वी ३० वेळा एटीएमवरुन पैसे काढलेचे दिसून आले. त्यांनी आपण पैसे काढले नसल्याचे बँक प्रशासनाला सांगितले.
बँकच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी काझी यांचे एटीएमवरील व्यवहार बंद केले. आपल्या खात्यावरुन प्रतिभानगर येथील स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, आजरा बँक आणि बेळगाव येथील एका बँकेच्या एटीएम सेंटरवरुन परस्पर पैसे काढल्याचे स्टेटमेंन्ट बँकेने दिले.
संशयित हॅकर्सने काझी यांच्या एटीएम नंबरवरुन आॅनलाईन सिस्टीमद्वारे खात्यावरील पैसे परस्पर काढलेचे निष्पन्न झाले. काझी यांना बँकेकडून खात्यावरील पैसे कमी झालेचा मॅसेज न आल्याने त्यांचे लक्षात आले नाही. पोलीस संबधीत एटीएम सेंटरवरील सीसीटीव्ही फुटेजवरुन संशयिताचा शोध घेत आहेत.
हॅकर्सचे कोल्हापूरात वास्तव
एटीएम मशीनला स्कीमर बसवून जगभरातील विविध बँकांतील ग्राहकांच्या खात्यांवरील आॅनलाईन सिस्टीम हॅक करून त्यावरून कोट्यवधी रुपये लुटणाऱ्या दोघा रुमानियन परदेशी हॅकर्सना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली होती. असे आणखी काही हॅकर्स कोल्हापूरात वास्तव्यास असून त्यांनी काझी सारखा अनेकांना गंडा घातला घातल्याची शंका आहे.