कोल्हापूर : ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉन, एकात्मतेच्या संदेशासाठी अधिकारी, कर्मचारी धावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 04:04 PM2018-10-31T16:04:19+5:302018-10-31T16:07:08+5:30
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्'ातील सर्व शासकीय विभागातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी बुधवारी शहरातील प्रमुख मार्गावरून धावले. बिंदू चौक आणि दसरा चौक येथे पोलीस बँन्डचे धूनने सर्वांचे स्वागत करण्यात आले.
कोल्हापूर : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्'ातील सर्व शासकीय विभागातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी बुधवारी शहरातील प्रमुख मार्गावरून धावले. बिंदू चौक आणि दसरा चौक येथे पोलीस बँन्डचे धूनने सर्वांचे स्वागत करण्यात आले.
जिल्हा पोलीस दल आणि बँक आॅफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सकाळी सात वाजता बिंदू चौकातून या ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचा प्रारंभ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला.
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी बुधवारी आयोजित केलेल्या ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व कर्मचारी. (छाया : आदित्य वेल्हाळ)
रॅली बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, ‘सीपीआर’ चौक ते दसरा चौकात आलेनंतर समारोप झाला. यावेळी कमी वेळेत संपूर्ण अंतर पार करणाऱ्या पुरुष व महिला गटातील सहा विजेत्यांचा मेडल देवून गौरव करण्यात आला.
रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, गृह पोलीस उपअधीक्षक सतिश माने, शहर पोलीस उपअधीक्षक प्रशांत माने, करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, बँक आॅफ इंडियाचे वरीष्ठ व्यवस्थापक नितीन कुलकर्णी आदींसह ३00 शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी सहभागी झाले होते.
विजेते स्पर्धेक असे
शशांक मनोहर खटावकर, शोभा संजय खरात (प्रथम), समीर बशीर देसाई, भाग्यश्री गणेश वडर (द्वितीय), शंकर रावसाहेब शिंदे, शितल संभाजी शिणगारे (तृतीय)