मराठा आरक्षण: कोल्हापूरच्या सकल मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा

By समीर देशपांडे | Published: June 9, 2024 12:48 PM2024-06-09T12:48:55+5:302024-06-09T12:49:45+5:30

आज शाहू समाधीस्थळी येणार एकत्र

Kolhapur Sakal Maratha community supports Manoj Jarange Patil over Maratha Reservation | मराठा आरक्षण: कोल्हापूरच्या सकल मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा

मराठा आरक्षण: कोल्हापूरच्या सकल मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा

समीर देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: मराठा आरक्षणातील सगेसोऱ्यांच्या समावेशाबद्दलची मागणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्याचा निर्णय कोल्हापूरच्या सकल मराठा समाजाने घेतला आहे. यासाठी आज सोमवारी सकाळी ११ वाजता छत्रपती शाहू समाधीस्थळी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणातील उर्वरित मांगण्यासाठी जरांगे पाटील यांनी हे उपोषण सुरू केले आहे. यासाठी सकल मराठा समाज, सर्व मराठा संघटना, मराठा आरक्षणाचे हितचिंतक यांनी या ठिकाणी उपस्थित रहावे. सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत या ठिकाणी या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सर्वजण एकत्र येणार असल्याचे बाबा इंदूलकर यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur Sakal Maratha community supports Manoj Jarange Patil over Maratha Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.