कोल्हापूर : राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त मशाल मिरवणूक उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 05:11 PM2018-08-29T17:11:53+5:302018-08-29T17:15:27+5:30
कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा हॉकी असोसिएशन यांच्यावतीने राष्ट्रीय क्रीडादिन व मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त शहराच्या प्रमुख मार्गावरुन क्रीडाज्योत प्रज्वलित करुन शहराच्या प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढण्यात आली. यात शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी, प्रशिक्षक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आदी सहभागी झाले होेते.
कोल्हापूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा हॉकी असोसिएशन यांच्यावतीने राष्ट्रीय क्रीडादिन व मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त शहराच्या प्रमुख मार्गावरुन क्रीडाज्योत प्रज्वलित करुन शहराच्या प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढण्यात आली. यात शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी, प्रशिक्षक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आदी सहभागी झाले होेते.
भवानी मंडप येथील राज्यातील एकमेव क्रीडा स्तंभाचे पूजन गोकूळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या हस्ते पूजन झाले. त्यानंतर क्रीडा स्तंभापासून विद्यापीठ हायस्कूल, बिनखांबी गणेश मंदीर, खरी कॉर्नर, नंगीवली तालीम मंडळ, वारे वसाहत, संभाजी नगर तरुण मंडळ, निर्माण चौक ते मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे ही मिरवणूक समाप्त झाली.
संपूर्ण मिरवणूक मार्गावर फुलांचे उधळण व क्रीडा घोष वाक्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या रॅलीत महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर हायस्कूल, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, स.म.लोहिया हायस्कूल, विमला गोयंका इंग्लिश मिडीयम स्कूल, न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, कोल्हापूर जिल्हा ज्युदो असोसिएशन, जिल्हा तलवारबाजी असोसिएशन, आदींनी सहभाग घेतला.
मशाल मिरवणूक सांगता समारंभात विविध खेळात प्राविण्य दाखविलेल्या ३२ खेळाडूं व शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार विजेते बिभीषण पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते कुमार आगळगावकर, आर.डी.पाटील, शहाजी सुर्यवंशी, जागतिक बॉडी बिल्डींग स्पर्धेत सहभागी झालेले विजय मोरे, एकलव्य छत्रपती पुरस्कार विजेते अनिल पवार, आदी मान्यवरांचा पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी केले.
यावेळी अजित पाटील, प्रदीप साळोखे, संदीप पाटील, रघू पाटील, विजय साळोखे (सरदार), विकास माने, बालाजी बरबंडे, विकास माने, सागर जाधव, व्ही.एस.भोयर, क्रीडा अधिकारी राजेंद्र घाडगे, प्रविण कोंढावळे, विकास माने, आदी मान्यवर उपस्थित होते.