कोल्हापूर : संभाजी भगत, अमर कांबळे यांना क्रांतीयोद्धा पुरस्कार, विश्वजित कांबळे यांची माहिती, शनिवारी वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 03:23 PM2017-12-19T15:23:47+5:302017-12-19T15:29:58+5:30
युवा आंबेडकरवादी क्रांतीदलातर्फे देण्यात येणारा क्रांतीयोद्धा पुरस्कार विद्रोही शाहीर संभाजी भगत व साहित्यीक डॉ. अमर कांबळे यांना जाहीर झाला. रोख दहा हजार रुपये, व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेचे अध्यक्ष विश्वजित कांबळे यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
कोल्हापूर : युवा आंबेडकरवादी क्रांतीदलातर्फे देण्यात येणारा क्रांतीयोद्धा पुरस्कार विद्रोही शाहीर संभाजी भगत व साहित्यीक डॉ. अमर कांबळे यांना जाहीर झाला. रोख दहा हजार रुपये, व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेचे अध्यक्ष विश्वजित कांबळे यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
शनिवारी (दि. २३) शाहू स्मारक भवनात सायंकाळी साडे पाच वाजता प्रा. डॉ. मिलिंद आव्हाड, प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे, माजी खासदार निवेदिता माने, आमदार राजीव आवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. अध्यक्षस्थानी उपराकार लक्ष्मण माने असतील. यावेळी डॉ. मिलिंद आव्हाड लिखित अण्णाभाऊ साठे जीवन आणि कार्य या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील लहू येथील संभाजी भगत यांच्यावर लोककलेचे संस्कार झाले. शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकामुळे त्यांना नवी ओळख मिळाली. त्यांनी कातळाखालचे पाणी या आत्मचरित्रासह नाटक व गाणी लिहीली आहे. कला क्षेत्रातील .योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शिरोळ येथील प्रा. डॉ. अमर कांबळे यांनी नालंदा प्रशासकीय सेवा अॅकॅडमीच्या माध्यमातून बहूजन समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले आहे. त्यांचे जवळपास ११० विद्यार्थी प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.
या विषयावर त्यांचे लेख व पुस्तके प्रकाशीत असून ते व्याख्यानाद्वारेही विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. तरी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.