कोल्हापूर, सांगलीत ‘शत-प्रतिशत’ खड्डेमुक्ती, युद्धपातळीवर प्रयत्न करून अधिकाऱ्यांनी केले काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 02:46 PM2017-12-16T14:46:43+5:302017-12-16T14:54:42+5:30
कोल्हापूर आणि सांगली जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारितील रस्ते शत-प्रतिशत खड्डेमुक्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्याचे या खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूरचे असल्याने अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून या दोन्ही जिल्ह्यांतील हे काम पूर्ण केले आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारितील रस्ते शत-प्रतिशत खड्डेमुक्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्याचे या खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूरचे असल्याने अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून या दोन्ही जिल्ह्यांतील हे काम पूर्ण केले आहे.
कोल्हापूर जिल्हयात १०९६ किलोमीटरचे राज्य रस्ते आहेत. त्यातील ६८७ किलोमीटरच्या रस्त्यामध्ये खड्डे होते तर प्रमुख जिल्हा मार्ग १५२२ किलोमीटरचे आहेत. त्यातील १०३१ किलोमीटरमध्ये खड्डे होते.
सांगली जिल्ह्यात १२४१ किलोमीटरचे राज्य रस्ते आहेत. त्यातील ७४३ किलोमीटरच्या रस्त्यांमध्ये खड्डे होते तर प्रमुख जिल्हा मार्ग १९१८ किलोमीटरचे आहेत. त्यातील ११२१ किलोमीटरमध्ये खड्डे होते. या दोन्ही जिल्ह्यांतील रस्त्यांचे खड्डे भरण्याचे काम सुमारे १५० कंत्राटदारांकडे दिले होते व त्यासाठी सुमारे ६ कोटी रुपये खर्च आला.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याने सुरुवातीपासूनच या कामामध्ये आघाडी घेतली होती. या खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यातील जे १७ जिल्हे खड्डेमुक्त झाल्याचे जाहीर केले आहे. त्यात या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. शासनाच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे हे खड्डे भरण्यात आले आहेत.
- सदाशिव साळुंखे, अधीक्षक अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर