Kolhapur: संजय मंडलिक, हसन मुश्रीफ सर्कशीतले वाघ, ठाकरे गटाचा टोला

By भीमगोंड देसाई | Published: October 3, 2023 03:46 PM2023-10-03T15:46:24+5:302023-10-03T15:46:46+5:30

Kolhapur News: हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांनी टिका केली. हे दोघेही सर्कशीतले वाघ आहेत. त्यांना दात आणि नखेही नाहीत. या दोघांनी पहिल्यांदा इतिहासाचा अभ्यास करावा आणि नंतर ठाकरे यांच्यावर बोलावे अन्यथा गाठ आमच्याशी आहे,

Kolhapur: Sanjay Mandlik, Hasan Mushrif Sarkshitale Vagh, Thackeray group gang | Kolhapur: संजय मंडलिक, हसन मुश्रीफ सर्कशीतले वाघ, ठाकरे गटाचा टोला

Kolhapur: संजय मंडलिक, हसन मुश्रीफ सर्कशीतले वाघ, ठाकरे गटाचा टोला

googlenewsNext

- भीमगोंडा देसाई 
कोल्हापूर -छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे लंडनमधून आणतो असे सरकारकडून सांगितले जात आहे. ती शिवरायांचीच खरी वाघनखे आहेत का ?  असा प्रश्न युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विचारला. यावर हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांनी टिका केली. हे दोघेही सर्कशीतले वाघ आहेत. त्यांना दात आणि नखेही नाहीत. या दोघांनी पहिल्यांदा इतिहासाचा अभ्यास करावा आणि नंतर ठाकरे यांच्यावर बोलावे अन्यथा गाठ आमच्याशी आहे, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, विजय देवणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. 

ते म्हणाले, अफझलखान वधावेळी जी वाघनखे, शस्त्रे वापरली होती, त्याबाबत १९१९ पर्यंत स्पष्टता होती. ती शस्त्रे सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होती. त्याविषयीच्या नोंदी आहेत. मात्र आता जे व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखे राज्य सरकार परत आणत आहेत, ती अफजलखानाचा वध केलेली वाघनखे नाहीत हे स्पष्ट आहे, असे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे. वाघनखे आणण्यास शिवसेनेचा विरोध नाही. मात्र त्यांची सत्यता पडताळणे महत्वाचे आहे. यावेळी सुनील मोदी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 
 
मुश्रीफांना पुस्तक देणार
मंत्री हसन मुश्रीफ,  खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी कोल्हापूर जिल्हयातील गड किल्ल्यांसाठी सत्ता असताना काय काम केले ते प्रथमतः स्पष्ट करावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तपासावा. इतिहास संशोधक सावंत यांचे शोध भवानी तलवारीचा या पुस्तकातील वाघनख एक अभ्यास हा धडा वाचावा. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यावर बोलावे. यासाठी आम्ही इतिहास संशोधक सावंत यांचे शोध भवानी तलवारीचा हे पुस्तक मंत्री मुश्रीफ यांना देणार आहोत, असे देवणे यांनी स्पष्ट केले.

लक्ष विचलीत करण्यासाठी..
सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. म्हणून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी ‘वाघनखे’ हा विषय बाहेर काढला आहे. मात्र जनतेला सर्वकाही माहीत आहे. यामुळे येत्या निवडणुकीत हेच वाघनखे यांचे करेक्ट कार्यक्रम करतील, असे पवार यांनी सांगितले. 
 
तिकिटासाठी मातोश्रीवर हेलपाटे 
आदित्य ठाकरे यांच्यावर टिका करणारे संजय मंडलिक हे लोकसभेचे तिकिट मिळवण्यासाठी मातोश्रीवर अनेकवेळा हेलपाटे मारले. त्याचा मी साक्षीरदार आहे. यामुळे मंडलिक यांनी जपून बोलावे, असा इशाराही पवार यांनी दिला.

Web Title: Kolhapur: Sanjay Mandlik, Hasan Mushrif Sarkshitale Vagh, Thackeray group gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.