कोल्हापूर : मुक परिक्रमेतून ‘ रंकाळा वाचवा’ ची साद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 05:30 PM2018-12-25T17:30:01+5:302018-12-25T17:31:34+5:30
कोल्हापूर : रंकाळा संवर्धन, संरक्षण समिती व रंकाळा प्रेमींतर्फे रंकाळा दिवसानिमित्त कोल्हापूरचा श्वास व वैभव असणाऱ्या रंकाळा तलावातील वाढते ...
कोल्हापूर : रंकाळा संवर्धन, संरक्षण समिती व रंकाळा प्रेमींतर्फे रंकाळा दिवसानिमित्त कोल्हापूरचा श्वास व वैभव असणाऱ्या रंकाळा तलावातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी शासनाने त्वरीत पावले उचलावीत. या मागणीसाठी रंकाळा प्रेमींतर्फे मंगळवारी सकाळी मुक रंकाळा परिक्रमा काढण्यात आली.
रंकाळा चौपाटी उद्यानातील नवनाथ मंदीरापासून सुरू झालेली ही परिक्रमा चौपाटी, रंकाळा टॉवर, संध्यामठ, इराणी खण, खणेश्वर, मार्गे पदपथ उद्यानात परिक्रमेचा समारोप झाला. गेल्या चार पाच वषार्पासून रंकाळ्याचे पाणी कमालीचे प्रदूषित झाले आहे.
मासे, कासवे आदी जलचर प्राणी मृत्युमुखी पडत आहेत. पाण्यावर हिरवा तवंग आला आहे. त्यामुळे जल प्रदूषण तात्काळ हटवावे. कोल्हापूरकरांचा श्वास असलेल्या ऐतिहासिक रंकाळ्याला पुर्नवैभव मिळवून देण्यासाठी रंकाळ्याचा कायमस्वरूपी ठोस विकास आराखडा राबवावा. असा सुर उपस्थितांमधून उमटला.
डॉ.अमर आडके म्हणाले, रंकाळा विकासासाठी लोक चळवळ उभी रहायला हवी .रंकाळा संवर्धनाच्या कामासाठी लोकांचा सहभाग वाढायला हवा. रंकाळाक्षेत्र वर्षुनवर्ष कमी होऊ लागलेय ,हा धोका वेळीच ओळखायला हवा.रंकाळा प्रदूषणावर उपाय शोधण्याची गरज आहे. रंकाळ्यामुळे कोल्हापूकरांच्या आयुष्यातील एक श्वास वाढला आहे.
इराणीखणी पासून रंकाळा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी जो मार्ग नाही तो निर्माण करूया.यावेळी रंकाळा प्रेमी व चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक राजेंद्र पाटील यांनी केले.
या परिक्रमेत आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे,चंद्रकांत वडगावकर, क्रीडाईचे संचालक सागर नालंग, अशोक देसाई,लोकमत चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील,बी न्यूज चे वृत्त संपादक विजय कुंभार,दीपक पोलादे, संग्राम भालकर, सुभाष हराळे, संपतराव पाटील, धोंडीराम चोपडे, गुंडोपंत जितकर, प्रवीण वायचळ, जितेंद्र लोहार, शितल येळावकर, विजयमाला चिखलीकर, डॉ.रूपाली दळवी, डॉ. सरदार पाटील, संभाजी पाटील आदी सहभागी झाले होते.
परिक्रमेचे नियोजन रंकाळा समितीचे अभिजीत चौगुले ,विजय सावंत, प्रा.एस.पी.चौगुले,यशवंत पाटील, राजेंद्र पाटील,सुधीर राऊत, राजेंद्र इनामदार यांनी केले.