राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या पाचजणांची निवड, अंदमान निकोबार येथे होणार स्पर्धा
By सचिन भोसले | Published: December 21, 2023 12:35 PM2023-12-21T12:35:07+5:302023-12-21T12:35:21+5:30
कोल्हापूर : अंदमान निकोबार येथे २८ डिसेंबर २०२३ ते २ जानेवारी २०२४ दरम्यान होणाऱ्या शालेय राष्ट्रीय फुटबाॅल स्पर्धेसाठी महाराष्ट्र ...
कोल्हापूर : अंदमान निकोबार येथे २८ डिसेंबर २०२३ ते २ जानेवारी २०२४ दरम्यान होणाऱ्या शालेय राष्ट्रीय फुटबाॅल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात कोल्हापूरच्या पाच खेळाडूंची निवड झाली. निवड झालेले पाचहीजण महाराष्ट्र हायस्कूलचे विद्यार्थी आहेत.
निवड झालेल्यांमध्ये सौरभ ढाले, अभयसिंह पाटील, रिहान मुजावर, संचित तेलंग, इशान तिवले यांचा समावेश आहे. या पाचजणांची निवड उदगीर (लातूर) येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून झाली. गेली तीस वर्षांहून अधिक काळ या शाळेचे विद्यार्थी सातत्याने राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करीत आहेत. याशिवाय विभाग आणि राज्याचे विजेतेपदही याच शाळेच्या १४ आणि सतरा, एकोणीस वर्षाखालील संघांनी बहुतांशी वेळा मिळवले आहेत.
विशेष म्हणजे उन असो वा पाऊस या शाळेचे फुटबाॅल खेळणारे खेळाडू सकाळी ५.३० वाजता सरावासाठी शाळेच्याच मैदानवर हजर असतात. सरावातील सातत्यामुळे या शाळेचे स्थानिक १६ संघांतून खेळतात. याशिवाय राज्य ,राष्ट्रीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी करीत आहेत. या संघाला क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, राष्ट्रीय खेळाडू संतोष पवार, शरद मेढे, सुर्यदीप माने, सुर्यजित घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.