कोल्हापूर : अभाविपचे मिशन साहसी, कोल्हापूरात विद्यार्थीनींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 07:54 PM2018-10-30T19:54:55+5:302018-10-30T20:10:17+5:30

अभाविपच्या माध्यमातून देशभरात विद्यार्थीनींना भयमुक्त बनविण्यासाठी तसेच कुठल्याही परिस्थितीत लढा देण्यासाठी स्व- संरक्षणाच्या प्रशिक्षणाचे एक राष्ट्रव्यापी मिशन साहसीच्या रुपात प्रारंभ झाले आहे. पूर्ण देशभरात ५ लाख पेक्षा जास्त विद्यार्थीनीना आपल्या क्षमतांचे विभिन्न स्थानांवर प्रदर्शन करण्याची संधी मिळाली आहे.

Kolhapur: Self-protection training for students of ABVIPP, Kolhapur Students | कोल्हापूर : अभाविपचे मिशन साहसी, कोल्हापूरात विद्यार्थीनींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण

कोल्हापूर : अभाविपचे मिशन साहसी, कोल्हापूरात विद्यार्थीनींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण

googlenewsNext
ठळक मुद्देअभाविपचे मिशन साहसीकोल्हापूरात विद्यार्थीनींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण

कोल्हापूर : अभाविपच्या माध्यमातून देशभरात विद्यार्थीनींना भयमुक्त बनविण्यासाठी तसेच कुठल्याही परिस्थितीत लढा देण्यासाठी स्व- संरक्षणाच्या प्रशिक्षणाचे एक राष्ट्रव्यापी मिशन साहसीच्या रुपात प्रारंभ झाले आहे. पूर्ण देशभरात ५ लाख पेक्षा जास्त विद्यार्थीनीना आपल्या क्षमतांचे विभिन्न स्थानांवर प्रदर्शन करण्याची संधी मिळाली आहे.


अभाविप कोल्हापूर महानगराने शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर येथे दिनांक २५ ऑक्टोंबर ते ३० ऑक्टोंबर २०१८ या दरम्यान मिशन साहसी या कार्यशाळेचे आयोजन केले. २५ ऑक्टोंबर २०१८ रोजी पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी माळी, शासकीय तंत्रानिकेतनचे प्राचार्य प्रशांत पट्टलवार, मास्टर अमोल भोसले तसेच अभाविप प्रांत सहमंत्री साधना वैराळे यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन झाले.

पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी माळी यांनी विद्यार्थीनीना महिला विषयातील कायद्यांचे मार्दर्शन केले. तसेच प्राचार्य प्रशांत पट्टलवार सरांनी विद्यार्थीनीना प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घेऊन काम करण्यास प्रोत्साहन दिले. साधना वैराळे यांनी कोणावर अवलंबून राहू नये तसेच निडर बनून जगावे व कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

५ दिवसांचे प्रशिक्षण मास्टर अमोल भोसले तसेच त्यांचे सहकारी सुरज राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाले. प्रत्यक्ष आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या वस्तूंचा (उदा. पेन, आय कार्ड , हेअर पिन, स्कार्प) स्व- संरक्षणासाठी उपयोग कसा करायचा तसेच कोणतीही वस्तू उपलब्ध नसताना जर अतिप्रसंग ओढावला तर त्यातून आपली सुटका कशी करायची याचे प्रशिक्षण दिले. ६७ विद्यार्थीनीनी प्रशिक्षण घेतले.



या कार्यशाळेचा समारोप शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर येथे डॉ. रमा गर्गे, प्राचार्य  प्रशांत पट्टलवार, मास्टर अमोल भोसले, अभाविप प्रांत सहमंत्री साधना वैराळे यांच्या उपस्थितीत झाला. डॉ. रमा गर्गे यांनी ५ दिवसाच्या प्रशिक्षणात जे शिकलो याचा नियमित सराव करावा व जे ज्ञान आपण प्राप्त केले ते इतर विद्यार्थीनीना देण्याचे आवाहन केले.

कार्यशाळेच्या नियोजनात कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक गायत्री पाटील व शाहूनगर मंत्री  रेवती पाटील तसेच पूर्वा मोहिते या कार्यकर्त्यांनी लक्ष घातले.

Web Title: Kolhapur: Self-protection training for students of ABVIPP, Kolhapur Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.