कोल्हापूर :रुग्णालय तपासणी अहवाल केंद्राकडे पाठविणार, नियमित तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 11:19 AM2018-11-15T11:19:14+5:302018-11-15T11:20:22+5:30

केंद्र सरकारच्या सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसर्च एजन्सी कमिटीने कोल्हापूर व कागलमधील प्रसूतिकेंद्राची अचानक पाहणी केली. याचा अहवाल पुढील आठवड्यात केंद्रीय महिला बालकल्याण विभागाकडे सादर केला जाणार आहे. दरम्यान, ही तपासणी नियमित होती, कायद्याचे पालन होते की नाही? याची पाहणी केली गेली, तपासणी झालेल्या रुग्णालयामध्ये काहीही आक्षेपार्ह आढळले नाही, असे जिल्हा पर्यवेक्षक अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Kolhapur: To send the hospital inspection report to the center, regular check-up | कोल्हापूर :रुग्णालय तपासणी अहवाल केंद्राकडे पाठविणार, नियमित तपासणी

कोल्हापूर :रुग्णालय तपासणी अहवाल केंद्राकडे पाठविणार, नियमित तपासणी

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णालय तपासणी अहवाल केंद्राकडे पाठविणार, नियमित तपासणीआक्षेपार्ह आढळले नसल्याचा समितीचा निर्वाळा

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसर्च एजन्सी कमिटीने कोल्हापूर व कागलमधील प्रसूतिकेंद्राची अचानक पाहणी केली. याचा अहवाल पुढील आठवड्यात केंद्रीय महिला बालकल्याण विभागाकडे सादर केला जाणार आहे. दरम्यान, ही तपासणी नियमित होती, कायद्याचे पालन होते की नाही? याची पाहणी केली गेली, तपासणी झालेल्या रुग्णालयामध्ये काहीही आक्षेपार्ह आढळले नाही, असे जिल्हा पर्यवेक्षक अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मंगळवारी झालेल्या तपासणीच्या संदर्भात जिल्हा पर्यवेक्षक अधिकारी इ. एम. बारदेस्कर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसर्च एजन्सीचे केंद्रीय सदस्य व महाराष्ट्राचे प्रभारी असलेल्या डी. शिवानंद, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सागर दाते व आपण स्वत: अशा तिघांनी एकत्रितपणे रुग्णालयांची तपासणी केली.|

इचलकरंजीमध्ये सहा महिन्यांपूर्वी अर्भक विक्रीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवानंद यांनी कोल्हापूरला भेट दिली होती. या प्रकरणानंतर दुसºयांदा ते मंगळवारी कोल्हापुरात आले होते. या समितीने प्रसूतिसाठी प्रसिद्ध असणाºया रुग्णालयामध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, रेकॉर्ड तपासले.

आता हा तपासणी अहवाल केंद्र सरकारकडे गेल्यानंतर त्यासंदर्भात पुढील सूचना येणार आहेत. तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे शिवानंद यांनीच सांगितल्याचे जिल्हा पर्यवेक्षकांनी सांगितले.

 

Web Title: Kolhapur: To send the hospital inspection report to the center, regular check-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.