कोल्हापूर : महागणपती शॉर्टफिल्म स्पर्धेत शहा, शिवदास विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 11:39 AM2018-10-19T11:39:15+5:302018-10-19T11:40:58+5:30

शिवाजी चौक तरुण मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात आयोजित केलेल्या महागणपती शॉर्ट फिल्म स्पर्धेत राकेश व रिंकेश शहा यांनी प्रथम क्रमांक पटकावला; तर अभिषेक शिवदास व सुदर्शन व्हंडकर यांना द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला.

Kolhapur: Shah, Shivdas winners in the Mahagannapati short film competition | कोल्हापूर : महागणपती शॉर्टफिल्म स्पर्धेत शहा, शिवदास विजेते

कोल्हापुरातील शिवाजी चौक तरुण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या महागणपती शॉर्टफिल्म स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

Next
ठळक मुद्देमहागणपती शॉर्टफिल्म स्पर्धेत शहा, शिवदास विजेतेमुंबईनंतर कोल्हापुरात प्रथमच आयोजन, स्पर्धकांकडून प्रतिसाद

कोल्हापूर : शिवाजी चौक तरुण मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात आयोजित केलेल्या महागणपती शॉर्ट फिल्म स्पर्धेत राकेश व रिंकेश शहा यांनी प्रथम क्रमांक पटकावला; तर अभिषेक शिवदास व सुदर्शन व्हंडकर यांना द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला.

शिवाजी चौक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून कला क्षेत्रातील मुला-मुलींना आपली कला दाखविता यावी म्हणून ‘महागणपती शॉर्ट फिल्म’ स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यावर्षीही या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेकरिता २० शॉर्ट फिल्म जमा झाल्या होत्या. त्याचा निकाल नुकताच परीक्षक मंगेश देसाई यांच्या उपस्थितीत देण्यात आला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, मधुरिमाराजे छत्रपती, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे, उद्योगपती शंकरशेठ दुल्हाणी, किसनराव खंदारे, डॉ. चंद्रकांत मिठारी यांच्या उपस्थितीत पार पडला.

मुंबईनंतर कोल्हापुरात प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, स्पर्धकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उत्सव कमिटीचे अध्यक्ष प्रसाद वळंजू यांनी सांगितले. अक्षय शिंदे व नितीन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास भाग्येश लंगरकर, मंगेश जाधव, अनिकेत दाभोळे, जयवंत वळंजू, साबीर ठाकूर, गुरुदेव स्वामी उपस्थित होते.

स्पर्धेतील अन्य विजेते

  1. -तृतीय क्रमांक - समाधान खंडागळे व तौफिक मीरशिकारी (विभागून)
  2.  उत्तेजनार्थ - अनिल ताते, नीलिशा सामंत, विजय साळोखे, निहाल बिडकर, विराज माने, अक्षय पोतदार.

 

 

 

Web Title: Kolhapur: Shah, Shivdas winners in the Mahagannapati short film competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.