कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा, पुढील वर्षीपासून एक कोटीचा निधी देण्याचा पालकमंत्र्यांचा मानस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 07:06 PM2022-10-04T19:06:27+5:302022-10-04T19:12:57+5:30

दसरा महोत्सवासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून निधी देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

Kolhapur Shahi Dussehra status as a state festival, the Guardian Minister intends to give a fund of one crore from next year | कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा, पुढील वर्षीपासून एक कोटीचा निधी देण्याचा पालकमंत्र्यांचा मानस

कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा, पुढील वर्षीपासून एक कोटीचा निधी देण्याचा पालकमंत्र्यांचा मानस

Next

मुंबई/कोल्हापूर : कोल्हापूरच्यादसरा महोत्सवाला छत्रपती शिवाजी महाराजांची शाही परंपरा आहे. हा सोहळा संपूर्ण जगासमोर यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने या सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून पुढील वर्षीपासून विविध माध्यमातून एक कोटी रूपये निधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. कोल्हापूर ही आंतरराष्ट्रीय पर्यटन नगरी बनण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

मंत्री केसरकर यांनी दसऱ्यानिमित्त कोल्हापूर तसेच राज्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, करवीर संस्थानच्या संस्थापक ताराराणी, सामाजिक क्रांतीचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज यांची परंपरा आणि करवीरनिवासिनी अंबाबाईच्या प्रती असलेली भक्ती यांचा संगम म्हणजे कोल्हापूरचा दसरा.

राजघराण्यामार्फत साजरा केला जाणारा हा सोहळा शासनामार्फत दरवर्षी दिमाखात साजरा केला जाणार आहे. कोल्हापूर संस्थानमार्फत छत्रपतींच्या परंपरा जपल्या जात आहेत. त्या यापुढेही जपण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

निधीस मंत्रिमंडळाची मान्यता

दसरा महोत्सवासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून निधी देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळाचे त्यांनी आभार व्यक्त केले. पुढील वर्षीपासून अतिशय भव्य स्वरूपात हा उत्सव साजरा केला जाईल असेही ते म्हणाले.

Web Title: Kolhapur Shahi Dussehra status as a state festival, the Guardian Minister intends to give a fund of one crore from next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.