मुख्यमत्र्यांनी कारवाई न केल्यास ६ मार्चच्या दौऱ्यात घुसून जाब विचारू, कोल्हापुरात शाहू सेनेचे 'जवाब दो' धरणे आंदोलन
By संदीप आडनाईक | Updated: March 1, 2025 22:35 IST2025-03-01T22:35:18+5:302025-03-01T22:35:27+5:30
Kolhapur: शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या अटकेची मागणी करत शाहू सेनेने शनिवारी छत्रपती शिवाजी चौकात 'जवाब दो' धरणे आंदोलन केले.

मुख्यमत्र्यांनी कारवाई न केल्यास ६ मार्चच्या दौऱ्यात घुसून जाब विचारू, कोल्हापुरात शाहू सेनेचे 'जवाब दो' धरणे आंदोलन
कोल्हापूर - शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या अटकेची मागणी करत शाहू सेनेने शनिवारी छत्रपती शिवाजी चौकात 'जवाब दो' धरणे आंदोलन केले. कोल्हापूरात गुन्हा दाखल होवूनही तीन दिवस कोरटकर सापडत नाही, ही गंभीर बाब असून सरकारने तत्काळ कोरटकरचा शोध घेऊन त्याला अटक करावी, अन्यथा कोल्हापूरच्या सुपुत्राला धमकी देऊनही मुख्यमत्र्यांनी कारवाई न केल्यास त्यांच्या ६ मार्च रोजी दौऱ्यात घुसून जाब विचारण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
शिवछत्रपतीेबद्दल अवमानकारक वक्तव्य होवूनसुधा निषेध न केल्याबद्दल यावेळी सत्ताधारी आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी 'जवाब दो' असा जाब यावेळी विचाण्यात आला. प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांनी गरळ ओकल्यानंतर त्यांना संरक्षण देणारे राज्य सरकार अवमान करणाऱ्यांचे समर्थन करत आहे काय? असा सवाल यावेळी कार्यकर्त्यांनी विचारला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी, अथर्व चौगुले, गणेश नलवडे, अथर्व बेलेकर, करण कवठेकर, साहिल पडवळे, शशिकांत सोनुले, अनुराग व्हसकोटी, ओंकार पाटील, रोनक पोवार सहभागी झाले होते.