सजीव चित्ररथांनी कोल्हापूर शाहूमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 04:23 PM2017-09-21T16:23:28+5:302017-09-21T16:27:27+5:30

  राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिनानिमित्त आयोजित केलेल्या गुरुवारी सकाळी शहरातून शालेय मुला मुलींची प्रभात फेरी आणि विविध शाळांनी काढलेल्या सजीव चित्ररथांनी संपूर्ण शहर शाहूमय झाले.

Kolhapur Shahuay with live pictures | सजीव चित्ररथांनी कोल्हापूर शाहूमय

राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिनास १०० वर्ष पूर्ण होत आहेत.यानिमित्त गुरुवारी सकाळी आयोजित केलेल्या चित्ररथांमध्ये वि.स.खांडेकर प्रशालेने केलेले सादरीकरण सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. (छाया : आदित्य वेल्हाळ )

Next
ठळक मुद्देराजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिन शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागीराजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, शाहू संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजन २१ ते २३ सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये विविध कार्यक्रमचित्ररथ पाहण्यासाठी गर्दी

 कोल्हापूर : राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिनानिमित्त आयोजित केलेल्या गुरुवारी सकाळी शहरातून शालेय मुला मुलींची प्रभात फेरी आणि विविध शाळांनी काढलेल्या सजीव चित्ररथांनी संपूर्ण शहर शाहूमय झाले.


राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि शाहू छत्रपती यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दसरा चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले.


राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिनास १०० वर्ष पूर्ण होत असून यानिमित्त राजर्षी शाहूंचे कार्य आणि विचार जनतेपर्यंत पोहोचावे म्हणून राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट व शाहू संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठातर्फे २१ ते २३ सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याअनुषंगाने गुरुवारी सकाळी कार्यक्रमाची सुरुवात झाली. पोलीस बँड हे या रॅलीतील मुख्य आकर्षण होते. शालेय झांज पथकाने परिसर दुमदुमून टाकला.


दसरा चौक येथून सुरु झालेली प्रभात फेरी व चित्ररथ रॅली आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, महापालिका, सीपीआर हॉस्पिटल मार्गे जावून या रॅलीचा शाहू स्मारक भवन येथे समाप्त करण्यात आली.

रॅलीमध्ये शालेय मुला मुलींची राजर्षी शाहू महाराज यांनी सक्तीच्या व मोफत शिक्षणासाठी केलेल्या कायद्यास १०० वर्ष होत असून त्या निमित्त शिक्षणाचे महत्व आणि राजर्षी शाहूंचे शिक्षणाचा कायदा या अनुषंगाने ‘सामाजिक परिवर्तनासाठी केवळ शिक्षण! ’ ‘ समाज सुधारक राजा शाहू महाराज! ’ ‘ शिक्षण कार्य हेच महान कार्य! ’ ‘शिकलेला माणूस कधीही कमजोर नसतो ’ अशा विविध घोषवाक्याचे फलक हे एक वेगळे आकर्षण होते.


यात वि.स.खांडेकर प्रशालेने ‘शाहू महाराजांचे शिक्षण विचार ’ , मुस्लिम बोर्डिंग हायस्कुलने ‘शाहू महाराजांचे शिक्षण ’ , तर प्रायव्हेट हायस्कुलच्या चित्ररथामध्ये ‘ शिक्षणाचे सार्वत्रिकरण ’ , राजाराम हायस्कुलच्या चित्ररथामध्ये ‘शाहूंचे जन्मस्थळ ’ , महाराष्ट्र हायस्कुलने ‘लेक वाचवा, देश वाचवा ’ चित्ररथ, उषा राजे हायस्कुलने ‘लोक शिक्षण गरजेचे ’ , साई हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजने ‘ प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे ’ , स.म. लोहिया हायस्कुलने शाहू महाराजांच्या कार्यावर आधारीत चित्ररथ, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कुलने कुस्ती तसेच देशभुषण हायस्कुलने ‘शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या घरी‘ या विषयावर सजीव चित्ररथ तयार केले होते. सकाळची वेळ असूनही लोकांनी चित्ररथ पाहण्यासाठी गर्दी केली होती.


यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, डॉ.अशोक चौसाळकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, शाहू स्मारक भवनचे कृष्णाजी हारुगडे, मराठा महासंघाचे जिल्हाअध्यक्ष वसंतराव मुळीक, मुस्लिम बोर्डींगचे गणी आजरेकर, कादर मलबारी यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Web Title: Kolhapur Shahuay with live pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.