राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत कोल्हापूरचा सार्थक चमकला; अखिल भारतीय सुपर टेनिस सीरिज स्पर्धा
By सचिन भोसले | Published: September 15, 2023 10:27 AM2023-09-15T10:27:27+5:302023-09-15T10:27:41+5:30
चौदा वर्ष वयोगटात दुहेरीत यश
कोल्हापूर : सार्थक गायकवाडने दर्श खेडकरच्या साथीने चेन्नई येथे झालेल्या अखिल भारतीय सुपर टेनिस सीरिज स्पर्धेत चौदा वर्षाखालील वयोगटात दुहेरीत अजिंक्यपद पटकावले. अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या सार्थक -दर्श या जोडीने तमिळनाडूच्या मीर फजल अली - मिथेल. ए या जोडीचा ३-६, ६-२,१०-५ असा पराभव केला.
तत्पूर्वी या जोडीला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. दुसऱ्या फेरीत कर्नाटकच्या प्रणित पुल आणि तामिळनाडूच्या अंशंकर या जोडीला ७-५,२-६,१०-५ असे हरवत पण ती फेरीत धडक मारली. उपांत्य लढतीत तामिळनाडूच्या निदेश बालाजी - अर्शिद जनिश या जोडीचा ६-०,६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव करीत अंतिम फेरी गाठ. सार्थक हा चाटे स्कूलचा विद्यार्थी व कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनचा खेळाडू आहे. त्याला प्रशिक्षक मनल देसाई आणि अर्शद देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.