कोल्हापूर :  शिरोली टोलनाक्याजवळ घरफोडी, पाच लाख किंमतीचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 05:22 PM2018-12-25T17:22:33+5:302018-12-25T17:23:50+5:30

रिवर्स साईट शिरोली टोलनाक्याजवळील चैतन्य अपार्टमेन्टमधील फलॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्याने पाच लाख किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. सोमवारी भरदिवसा ही चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांत भिती पसरली आहे.

Kolhapur: Shiroli TolaNa, with a burglary, worth Rs. 5 lakh | कोल्हापूर :  शिरोली टोलनाक्याजवळ घरफोडी, पाच लाख किंमतीचा ऐवज लंपास

कोल्हापूर :  शिरोली टोलनाक्याजवळ घरफोडी, पाच लाख किंमतीचा ऐवज लंपास

googlenewsNext
ठळक मुद्दे शिरोली टोलनाक्याजवळ घरफोडीपाच लाख किंमतीचा ऐवज लंपास

कोल्हापूर : रिवर्स साईट शिरोली टोलनाक्याजवळील चैतन्य अपार्टमेन्टमधील फलॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्याने पाच लाख किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. सोमवारी भरदिवसा ही चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांत भिती पसरली आहे.

अधिक माहिती अशी, वैशाली प्रदिप भोसले (वय ४७) ह्या सोमवारी (दि. २४) कुटूंबासह बहिणीच्या घरी लग्नाच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी गेल्या होत्या. रात्री परत आलेनंतर त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडलेला दिसला.

आतमध्ये पाहिले असता बेडरुममधील कपाटातील साहित्य विस्कटलेले होते. त्यातील चार तोळ्याच्या पाटल्या, साडेपाच तोळ्याच्या बांगड्या, साडेसहा तोळ्याचे गोट, पाच तोळ्याचे गंठण, अडीच तोळ्याचे गंठण, टॉप्स, भरीव तुकडा नग, तीन तोळ्याची अष्टपैलू माळ असा सुमारे पाच लाख किंमतीचे दागिने चोरुन नेल्याचे दिसून आले. या प्रकाराने भोसले कुटूंबिय भांबावून गेले. त्यांनी तत्काळ शाहुपूरी पोलीसांना कळवले.

पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सहकार्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. ठसेतज्ज्ञांनी चोरट्यांच्या हाताचे ठसे घेतले. श्वानाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता ते परिसरातच घुटमळले.

चार दिवसापूर्वी दिवंगत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या रमणमळा, छत्रपती पार्कमधील घराचा लाकडी दरवाजा तोडून चोरी झाली होती. आंदळकर यांच्या घरातील गेल्या दोन महिन्यांतील हा चोरीचा दुसरा प्रकार आहे.

शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलीसांची अपुरी संखा यामुळे रात्रगस्तीला पुरेसा पोलीस बंदोबस्त नसतो. त्याची संधी चोरटे घेत आहेत. भरदिवसा घरफोड्या होवू लागल्याने नागरिकांत भिती पसरली आहे.
 

 

Web Title: Kolhapur: Shiroli TolaNa, with a burglary, worth Rs. 5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.