कोल्हापूर : शिवाजी पूल अवजड वाहनांसाठी खुला, जिल्ह्यात पावसाची उघडझाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 06:05 PM2018-07-25T18:05:55+5:302018-07-25T18:09:04+5:30

गेले आठ-दहा दिवस अवजड वाहनांसाठी बंद केलेला शिवाजी पूल बुधवारी दुपारी अखेर वहातूकीसाठी खुला करण्यात आला. पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरू लागल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पाऊस कमी झाला असला तरी जिल्ह्यातील २७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Kolhapur: Shivaji bridge is open for heavy vehicles, rain in the district | कोल्हापूर : शिवाजी पूल अवजड वाहनांसाठी खुला, जिल्ह्यात पावसाची उघडझाप

कोल्हापूर : शिवाजी पूल अवजड वाहनांसाठी खुला, जिल्ह्यात पावसाची उघडझाप

ठळक मुद्दे शिवाजी पूल अवजड वाहनांसाठी खुला, पावसाची उघडझाप जिल्ह्यात  २७ बंधारे अद्याप पाण्याखाली

कोल्हापूर : गेले आठ-दहा दिवस अवजड वाहनांसाठी बंद केलेला शिवाजी पूल बुधवारी दुपारी अखेर वहातूकीसाठी खुला करण्यात आला. पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरू लागल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पाऊस कमी झाला असला तरी जिल्ह्यातील २७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

जोरदार पावसाने सर्वच नद्यांना पूर आला. पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर सर्व प्रकारच्या वहातूकीसाठी शिवाजी पूल बंद ठेवण्यात आला होता. सुरक्षितेच्या कारणासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला.

त्यानंतर पावसाचा जोर ओसरल्यानंतर पाण्याची पातळी कमी होत गेल्यानंतर दुचाकी वाहनांना वाहतूकीस परवानगी दिली होती. पण अजवड व चार चाकी वाहनांची वहातूक बंदच होती. गेले दोन दिवस पावसाची उघडझाप सुरू असल्याने पाण्याची पातळी कमी झाली आहे.

Web Title: Kolhapur: Shivaji bridge is open for heavy vehicles, rain in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.