कोल्हापूर : शिवाजी पुतळा सुशोभिकरण, चबुतऱ्याचा कॉलम तातडीने हटवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 04:59 PM2019-01-10T16:59:10+5:302019-01-10T17:07:05+5:30
अतिशय तणावपूर्ण वातावरणात गुरुवारी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी पूतळा सुशोभिकरणाची पहाणी केली. त्यावेळी पुतळा अगर चबुतऱ्याला धक्का न लावता सुशोभिकरण करु, पुतळ्याची जागा बदलण्यासाठी शेजारी चबुतऱ्यांसाठी उभारलेला काँक्रीटचा कॉलम तातडीने हटविला जाईल असे आश्वासन शहर अभियंता व इतर अधिकाऱ्यांनी स्वांतत्र्यसैनिक आणि कृती समितीच्या शिष्ठमंडळास दिले. त्यामुळे ऐतिहासिक शिवाजी पुतळा आणि चबुतऱ्यांची जागा बदलण्याचा प्रयत्न दक्ष नागरीकांमुळे महापालिका प्रशासनास मागे घ्यावा लागला.पहाणीवेळी आमदार क्षीरसागर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याने तणाव निर्माण झाला होते.
कोल्हापूर : अतिशय तणावपूर्ण वातावरणात गुरुवारी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी पूतळा सुशोभिकरणाची पहाणी केली. त्यावेळी पुतळा अगर चबुतऱ्याला धक्का न लावता सुशोभिकरण करु, पुतळ्याची जागा बदलण्यासाठी शेजारी चबुतऱ्यांसाठी उभारलेला काँक्रीटचा कॉलम तातडीने हटविला जाईल असे आश्वासन शहर अभियंता व इतर अधिकाऱ्यांनी स्वांतत्र्यसैनिक आणि कृती समितीच्या शिष्ठमंडळास दिले. त्यामुळे ऐतिहासिक शिवाजी पुतळा आणि चबुतऱ्यांची जागा बदलण्याचा प्रयत्न दक्ष नागरीकांमुळे महापालिका प्रशासनास मागे घ्यावा लागला.पहाणीवेळी आमदार क्षीरसागर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याने तणाव निर्माण झाला होते.
छत्रपती शिवाजी पुतळास ऐतिहासिक महत्व असल्याने हा पुतळा अगर चबुतरा हालव नये. चबुतऱ्यांची जागा बदलल्यास तेथील इतिहास दडला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी स्वांतत्र्यसैनिक आणि कृती समितीच्या शिष्ठमंडळाने निवासी उपजिल्हाधिकाारी संजय शिंदे यांची भेट घेऊन पुतळा व चबुतरा हलवू नये अशी मागणी केली होती.त्यात गुरुवारी सुशोभिकरणाची पहाणी करण्याचे ठरले.
गुरुवारी दुपारी कृती समितीचे निवास साळोखे, अशोक पोवार, रमेश मोरे, खादी ग्रामोद्योगचे सुंदर देसाई, अर्जून नलवडे, व्ही. डी. माने हे शिवाजी चौकात जमले. त्याची चाहूल लागताच महापालिकेच्या दिश्ोने शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपअभियंता एस. के. माने, आर्कीटेक्ट सूरुज जाधव, ठेकेदार अतुल मिरजकर या अधिकाऱ्यांसह आमदार समर्थक शिवसैनिक माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, सुनिल जाधव, राहूल बलदोडे आदी सुमारे १०० हूनजण चौकात आले. त्यामुळे तणावाचे वातावरण झाले.
दरम्यान, कृती समितीचे कार्यकर्ते, स्वातंत्रसैनिक व महापालिकेचे अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर तसेच रविकिरण इंगवले, सुनिल जाधव यांनी सुशोभिरण परिसराची पहाणी केली. यावेळी निवास साळोखे, अशोक पोवार, रमेश मोरे, खादी ग्रामोद्योगचे सुंदर देसाई, अर्जून नलवडे, व्ही. डी. माने, सुंदर देसाई, अशोक रामचंदाणी, फिरोजखान उस्ताद, दिलीप माने, संभाजी जगदाळे, श्रीकांत भोसले, रवि चव्हाण, सुनिल मोहिते आदी उपस्थित होते.