धक्कादायक ! दरड कोसळून अख्खाच्या अख्खा पेट्रोल पंप मातीच्या ढिगाऱ्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 10:18 AM2021-07-25T10:18:53+5:302021-07-25T10:20:56+5:30
Kolhapur flood and land slide: गगनबावडा तालुक्यातील अणदूर धुंदवडे रस्ता 15 फूट खचला
कोल्हापूर: गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेला मुसळधार पाऊस शनिवारी कमी होताना दिसला. पण, जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती मात्र जैसे थे होती. शहरातील चाळीस टक्के भाग पूराच्या पाण्याने वेढलेला आहे. यादरम्यान जिल्ह्यात विविध दुर्घटनाही घडल्याचे समोर येत आहे. कोल्हापुरातील शाहूवाडी येथे दरड कोसळून अख्खा पेट्रोप पंप मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी भूस्खलन होण्याच्या घटना समोर येत आहेत. जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील करंजफेणमध्ये घटना घडली आहे. परिसरातील पेट्रोप पंपावर ही दरड कोसळल्याने संपूर्ण पंप मातीच्या ढिगाऱ्याखाली गेला आहे. अख्खा पेट्रोप पंप नाहीसा झाल्याने घटनेची भीषणता लक्षात येईल.
भूस्खलनामुळे 15 फूट रस्ता खचला
पेट्रोल पंपावर दर कोसळल्याची घटना ताजी असतानाच तिकडे, जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील अणदूर धुंदवडे रस्ता तब्बल 15 फूट खचल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अणदूर धुंदवडे रस्ता खचल्याने आजूबाजूच्या पंधरा-वीस गावांचा संपर्क तुटला आहे. शनिवारी ही घटना घडली आहे. नेटवर्क नसल्याने याबाबत कोणालाच कल्पना नव्हती. आज पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिक जेव्हा घराबाहेर पडले तेव्हा हा प्रकार समोर आला आहे.
पंचगंगा नदीची पातळी 52 फुटांवर
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने काल सकाळी विश्रांती घेतली असून पंचगंगेची पाणी पातळी 52 इंचावर आली आहे. शनिवारी दिवसभरात शहरात पावसाने हजेरी न लावल्यामुळे कोल्हापुरकरांची महापुरातून सुटका होणार आहे. पण अजूनही अनेक भागात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. आता पावसाने उसंत घेतल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यावरच मोठ संकट टळलंय.