कोल्हापूर : शेतकरी, शेतमजुरांच्या मुलींसाठी शासनामार्फत शुभमंगल सामूहिक विवाह योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 02:21 PM2018-01-08T14:21:14+5:302018-01-08T14:25:37+5:30

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या मुलींच्या सामूहिक विवाहासाठी शुभमंगल सामूहिक विवाह योजना शासनामार्फत राबवण्यात येत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधितांनी कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधावा.

Kolhapur: Shubhamangal Group Marriage Plan for the farmers, farmers and the girl child workers | कोल्हापूर : शेतकरी, शेतमजुरांच्या मुलींसाठी शासनामार्फत शुभमंगल सामूहिक विवाह योजना

कोल्हापूर : शेतकरी, शेतमजुरांच्या मुलींसाठी शासनामार्फत शुभमंगल सामूहिक विवाह योजना

Next
ठळक मुद्देवधू महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्याची स्थानिक रहिवासी असावीजिल्हा नियोजन विकास समितीमार्फत विवाह योजना वस्तूंची खरेदीसाठी प्रतिजोडपी १० हजार रुपये अनुदान

कोल्हापूर : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या मुलींच्या सामूहिक विवाहासाठी शुभमंगल सामूहिक विवाह योजना शासनामार्फत राबवण्यात येत आहे.

सामूहिक विवाहाबाबत अधिक माहितीसाठी संबंधितांनी कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नितीन मस्के यांनी केले आहे.

या योजनेच्या अनुदानास पात्र ठरण्यासाठी वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा ११ लाख रुपये आहे. या योजनेंतर्गत शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तूंची खरेदीसाठी प्रतिजोडपी १० हजार रुपये अनुदान वधूच्या आईच्या नावे दिली जाते.

आई नसल्यास वडिलांच्या नावाने दिली जाते. आई-वडील दोघेही हयात नसल्यास वधूच्या नावाने देण्यात येते. सामूहिक विवाहाचे आयोजन विवाह समारंभाच्या खर्चासाठी २ हजार रुपये अनुदान दिले जाते.

शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना संपूर्णपणे जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत राबविण्यात येते. योजनेच्या लाभासाठी वधू महाराष्ट्रातील  संबंधित जिल्ह्याची स्थानिक रहिवासी असावी, संबंधित व्यक्तीकडे ग्रामसेवक तलाठी दाखला असावा.

 

Web Title: Kolhapur: Shubhamangal Group Marriage Plan for the farmers, farmers and the girl child workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.