कोल्हापूर : त्र्यंबोली देवीला चांदीच्या पादुका अर्पण, लाईन बझारतर्फे पालखी मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 05:31 PM2018-08-17T17:31:34+5:302018-08-17T17:37:02+5:30
गौरवशाली सैनिकी परंपरा लाभलेला इन्फंट्री वसाहतीत कार्यरत असलेल्या संरक्षण दलामध्ये त्र्यंबोली देवी ही शौर्याची प्रतीक. पूर्वी मराठा लाईफ इन्फंट्रीचे जवान मोहिमेवर जाताना आपले रक्षण करणाऱ्या या देवीची प्रतीकात्मक मूर्ती ते सोबत नेत असत. अशा या त्र्यंबोलीदेवीला लाईन बझारतर्फे शुक्रवारी सवाद्य मिरवणुकीने चांदीच्या पादुका अर्पण करण्यात आल्या.
कोल्हापूर : गौरवशाली सैनिकी परंपरा लाभलेला इन्फंट्री वसाहतीत कार्यरत असलेल्या संरक्षण दलामध्ये त्र्यंबोली देवी ही शौर्याची प्रतीक. पूर्वी मराठा लाईफ इन्फंट्रीचे जवान मोहिमेवर जाताना आपले रक्षण करणाऱ्या या देवीची प्रतीकात्मक मूर्ती ते सोबत नेत असत. अशा या त्र्यंबोलीदेवीला लाईन बझारतर्फे शुक्रवारी सवाद्य मिरवणुकीने चांदीच्या पादुका अर्पण करण्यात आल्या.
त्र्यंबोलीदेवीच्या आषाढी यात्रेलाही लाईन बझार व पोलीस मुख्यालयाच्या वतीने मानवंदना दिली जाते. पालखी मिरवणूक काढली जाते. देवीला हिंदू समाज व समस्त लाईन बझारमधील नागरिकांच्या वतीने कै. तानुबाई निकम यांच्या पुढाकाराने १९७० साली सोन्याच्या आलंकारिक पादुका (चपला) अर्पण करण्यात आल्या होत्या.
नंतर १९७१ च्या गावसभेत निकम यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला होता. मात्र कालौघात या आलंकारिक पादुका झिजल्या. त्यामुळे लाईन बझारच्या वतीने ४७ वर्षांनंतर पुन्हा एकदा देवीला चांदीच्या पादुका अर्पण करण्यात आल्या. यावेळी किसन पडवळे, लक्ष्मण गायकवाड, बबन पाटील, धनाजी तोरस्कर, विष्णुपंत पडवळे, सागर यवलुजे, विजय जाधव, मनोज इंगळे उपस्थित होते.