कोल्हापूर : कागलचा स्मार्ट चेकपोस्ट धूळ खात, दोन वर्षांपासून वापराविना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 06:51 PM2018-05-09T18:51:51+5:302018-05-09T18:51:51+5:30
जादा भार वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तपासणी करण्याकरिता अत्याधुनिक असा स्मार्ट चेकपोस्ट नाका राज्याचे शेवटचे टोक समजल्या जाणाऱ्या लिंगनूर (ता. कागल) येथे दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे. यासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. विशेष म्हणजे परिपूर्ण असा हा चेकपोस्ट नाका दोन वर्षांपासून वापराविना बंद अवस्थेत धूळ खात पडला आहे.
कोल्हापूर : जादा भार वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तपासणी करण्याकरिता अत्याधुनिक असा स्मार्ट चेकपोस्ट नाका राज्याचे शेवटचे टोक समजल्या जाणाऱ्या लिंगनूर (ता. कागल) येथे दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे. यासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. विशेष म्हणजे परिपूर्ण असा हा चेकपोस्ट नाका दोन वर्षांपासून वापराविना बंद अवस्थेत धूळ खात पडला आहे.
यात अत्याधुनिक स्कॅनर, सीसीटीव्ही, ५० टनांहून अधिकचे भारतोलन करणारे वे-ब्रिज, अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने, वाहनचालकाचे वाहन ताब्यात घेतल्यानंतर माल ठेवण्यासाठी गोडावून, जादा झालेला माल उतरवून घेण्यासाठी पार्किंग सुविधा, कँटीन सुविधा, स्वच्छतागृह, एवढेच काय वाहनचालकांना थांबण्यासाठी विश्रांतिगृह, आदींची सोय या चेकपोस्ट नाक्यावर करण्यात आली आहे.
यात शासनाचे कोट्यवधी रुपये गेल्या चार वर्षांहून अधिक काळ गुंतले आहेत. याशिवाय हा नाका अद्यापही सुरू न झाल्याने परिवहन कार्यालयाकडे येणारा महसूलही सुविधा नसल्याने बुडत आहे. अशा या चेकपोस्टचा मागोवा छायाचित्रांतून घेतला आहे.
विशेष म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणते, राज्य शासनाने हा चेकपोस्ट नाका अद्यापही संबंधित खात्याकडे हस्तांतरित केलेला नाही. यात महामार्गावर येण्यासाठी छोट्या पुलाची आवश्यकता आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य रस्ते महामार्ग महामंडळाने हा नाका सुरू करण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिलेले नाही. त्यामुळे हा नाका अद्यापही धूळ खात पडला आहे.
हा नाका राज्य शासनाच्या संबंधित खात्याने हस्तांतरित केल्यास तो त्वरित प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरू करण्यात येईल. त्यामुळे मालवाहतूक करणाºया वाहनांची तपासणी करणे आणि शासनाच्या महसुलात वाढ होण्यास मदत होईल.
- डॉ. डी. टी. पवार,
प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर