कोल्हापूर : शिवाजी ट्रेल ट्रेकमध्ये श्रीलंकेचे एनसीसी कॅडेटस् सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 06:05 PM2018-12-04T18:05:15+5:302018-12-04T18:09:00+5:30
शिवाजी पदभ्रमंतीतील सहभागामुळे आम्हाला एक अत्यंत दुर्मीळ ऐतिहासिक ठेवा पाहण्याचे भाग्य लाभले. कोल्हापुरी पद्धतीचे लज्जतदार जेवण खूप आवडले. हे दिवस आम्ही कधीच विसरू शकणार नाही, अशी भावना शिवाजी पदभ्रमंती सहभागी श्रीलंकन कॅडेटस्नी व्यक्त केली.
कोल्हापूर : शिवाजी पदभ्रमंतीतील सहभागामुळे आम्हाला एक अत्यंत दुर्मीळ ऐतिहासिक ठेवा पाहण्याचे भाग्य लाभले. कोल्हापुरी पद्धतीचे लज्जतदार जेवण खूप आवडले. हे दिवस आम्ही कधीच विसरू शकणार नाही, अशी भावना शिवाजी पदभ्रमंती सहभागी श्रीलंकन कॅडेटस्नी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा इतिहास समजावा, या उद्देशाने शिवाजी ट्रेल ट्रेकमध्ये श्रीलंका येथील कॅडेटस् आणि त्यांच्या समवेत एका आॅफिसरना प्रतिवर्षी एनसीसी युनिटतर्फे आमंत्रित केले जाते.
या कॅडेटस्ने व आॅफिसरने पन्हाळा पावनखिंड, विशाळगड या ऐतिहासिक मार्गावरून पदभ्रमंतीचा आनंद घेतला. यामध्ये श्रीलंकन आॅफिसर सेकंड लेफ्टनंट ए. एन. एम. पेरेरा, वॉरंट आॅफिसर डीएम सी. एम. जयसुंदरा, वॉरंट आॅफिसर डब्ल्यू. डी. डब्ल्यू. पी., सिनिअर सार्जंट डी. ए. ए. एस. गुनासेना., वॉरंट आॅफिसर रथनाश्री एच. पी. जीएम., सार्जंट अरियासीघे एडीआय. एम. यांचा समावेश होता. या कॅडेटस्नी आपल्या आपल्या संस्कृतीची व विचारांची देवाण - घेवाण ट्रॅकमधील सहभागी कर्नाटक, तमिळनाडू, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, पाँडेचरी, दिल्ली, गुजरात व महाराष्ट्र राज्यातील सहभागी कॅडेट्ससोबत केली.
श्रीलंकेतील सहभागी अधिकारी व कॅडेटस्ना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी ब्रिगेडिअर ए. बी. डोंग्रा, कर्नल आर. के. तिम्मापूर, कर्नल देवेन भारद्वाज, कर्नल एन. एस. सांगा., मेजर विश्वनाथ कांबळीमठ, डी. जी. भोसले, एस. एच. पोतदार, आदी उपस्थित होते.
-----------------------------------------------
०४१२२०१८ - कोल - एनसीसी
एन. सी. सी.तर्फे आयोजित शिवाजी पदभ्रमंतीमध्ये सहभागी श्रीलंकन कॅडेट्स व अधिकारी सोबत ब्रिगेडिअर ए. बी. डोंग्रा, कर्नल आर. के. तिम्मापूर, कर्नल देवेन भारद्वाज, कर्नल एन. एस. सांगा, मेजर विश्वनाथ कांबळीमठ.