कॅशलेश व्यवहारासाठी कोल्हापूरची एसटी सज्ज

By admin | Published: April 6, 2017 04:06 PM2017-04-06T16:06:33+5:302017-04-06T16:06:33+5:30

टोल भरण्यासाठी कोल्हापूर विभागातील ३३१ एसटीच्या बसवर ई-टॅग प्रणाली ,आरक्षणासाठी स्वाइप मशिन्सचा वापर

Kolhapur ST Ready for cashless transaction | कॅशलेश व्यवहारासाठी कोल्हापूरची एसटी सज्ज

कॅशलेश व्यवहारासाठी कोल्हापूरची एसटी सज्ज

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. ६ : नोटाबंदीनंतर संपूर्ण देशभरात कॅशलेस व्यवहार करण्यावर भर सरकार करत आहे. काळाची हीच गरज ओळखून राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागानेही कॅशलेस व्यवहारासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. टोल भरण्यासाठी कोल्हापूर विभागातील ३३१ एसटीच्या बसवर ई-टॅग प्रणाली लावण्यात आली आहे. तर आरक्षणासाठी स्वाइप मशिन्सचा वापर केला जात आहे.

सरकारने ५०० व १००० जुन्या नोटांवरील बंदीनंतर कॅशलेसचा पर्याय सार्वजनिक वाहतूक सेवांकडून निवडण्यात आला आहे. एस.टी महामंडळाकडूनही कॅशलेसचा पर्याय स्विकारण्यात आला आहे. टोल भरताना प्रवाशांचा वेळ वाया जातो, यावर पर्याय म्हणून एसटी बसवर ‘ई-टॅग’ बसवण्यात आल्या आहेत. यामुळे टोलची रक्कम थेट बँक खात्यातूनच वजा होतेच पण १० टक्के सूट एसटी बसना मिळत आहे. ई टॅग गाड्यासाठी प्रत्येक टोल नाक्यावर वेगळा बूथची व्यवस्था केली आहे.

याआधीच महामंडळाने आरक्षणासाठी अँड्रॉइड मोबाईल अ‍ॅप सुरू केले आहे. तर विमान, रेल्वेच्या रिझर्व्हेशन सुविधेप्रमाणे एसटीच्या प्रवाशांनाही आॅनलाइन आरक्षणाची सोय आहे. तसेच, एसएमएसद्वारे आरक्षण आदी सोयीसुविधा एसटी महामंडाळाकडून पुरवल्या जात असताना विविध आगारांतील तिकीट खिडक्यांवर आरक्षण करताना रोखीने व्यवहार केले जात होते. त्यामुळे सुट्टया पैशांवरून कर्मचार्यांसमवेत प्रवाशांचे वादाचे प्रसंग उद्भवत होते.

नोटाबंदीच्या काळात आरक्षणादरम्यान प्रवाशांचे होणारे हाल पाहता महामंडळाने संपूर्ण राज्यातील तिकीट बुकिंग खिडक्यांना स्वाइप मशिन्स वापरण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कोल्हापूर विभागाने मध्यवर्ती बसस्थानक व संभाजीनगर येथे तिकीट बुकिंग खिडक्यांना स्वाइप मशिन्स बसविले आहे. तिकटी खिडक्यांवर डेबिट, क्रेडिट कार्ड स्वाईप करून तिकिटांचे शुल्क भरता येणार आहे. तसेच विद्यार्थी पासची रक्कम ही स्वाइप मशिन्स भरता येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Kolhapur ST Ready for cashless transaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.