कोल्हापूर : बारावीच्या परीक्षेला प्रारंभ; केंद्रांवर बाहेर पालकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 06:57 PM2018-02-21T18:57:58+5:302018-02-21T19:01:24+5:30

‘पेपर शांतपणे सोडव’, ‘गडबड करू नको’, ‘गोंधळून जाऊ नको’ अशा सूचना स्वीकारीत बारावीच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी इंग्रजीचा पहिला पेपर दिला. या पेपरने बारावीच्या परीक्षेचा प्रारंभ झाला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा घेण्यात येत आहे.

Kolhapur: Start of HSC exam; Parents' crowd outside the centers | कोल्हापूर : बारावीच्या परीक्षेला प्रारंभ; केंद्रांवर बाहेर पालकांची गर्दी

कोल्हापूर : बारावीच्या परीक्षेला प्रारंभ; केंद्रांवर बाहेर पालकांची गर्दी

Next
ठळक मुद्देबारावीच्या परीक्षेला प्रारंभकेंद्रांवर बाहेर पालकांची गर्दी

कोल्हापूर : ‘पेपर शांतपणे सोडव’, ‘गडबड करू नको’, ‘गोंधळून जाऊ नको’ अशा सूचना स्वीकारीत बारावीच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी इंग्रजीचा पहिला पेपर दिला. या पेपरने बारावीच्या परीक्षेचा प्रारंभ झाला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा घेण्यात येत आहे. कोल्हापूर विभागातून या वर्षी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतून एकूण १ लाख २९ हजार परीक्षार्थ्यांनी यंदा परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण १५४ केंद्रांवर परीक्षा होत आहे. शहरातील विवेकानंद कॉलेज, महावीर महाविद्यालय, शहाजी कॉलेज, कॉमर्स कॉलेज, न्यू कॉलेज, गोखले कॉलेज, कमला महाविद्यालय, आदी परीक्षा केंद्रे सकाळी दहा वाजल्यापासून परीक्षार्थ्यांच्या गर्दीने फुलून गेली.

विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आई-वडील, आजी-आजोबांसह अन्य नातेवाईक यांचे आशीर्वाद घेऊन, तर काहींनी सकाळी विविध मंदिरांत जाऊन दर्शन घेतले. आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी काही पालकांनी सुटी घेतली होती; तर काहीजण अर्धी रजा घेतली होती. केंद्राबाहेरील परिसरात विद्यार्थी-विद्यार्थिनी नोट्स, पुस्तकांवर अखेरची नजर टाकली.

काहीजणांनी चर्चेतून उजळणी केली. परीक्षा केंद्रावर परीक्षार्थ्यांना ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्यात आला. त्यांना पेपरप्रारंभाच्या अर्धा तास आधी केंद्रात सोडण्यात आले. परीक्षार्थ्यांना पेपर नीट वाचता यावा, ते गोंधळून जाऊ नयेत यासाठी दहा मिनिटे आधी पेपर देण्यात आला. प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त होता.

महाविद्यालयांनी प्रथमोपचार आणि वैद्यकीय सुविधेची व्यवस्था केली आहे. परीक्षेतील पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाची भरारी पथकांनी विविध केंद्रांना भेटी दिल्या. परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालकांना केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी होती. पालक, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी पेपर सुटेपर्यंत आपल्या पाल्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर थांबून होते.

काहीसा तणाव

पहिला पेपर इंग्रजीचा असल्याने विद्यार्थी काहीसे तणावात होते. पेपर सुटल्यानंतर ‘पेपर सोपा होता’, ‘पेपर चांगला लिहिला’, ‘हुश्श... झाला इंग्रजीचा पेपर’ अशा प्रतिक्रिया परीक्षार्थ्यांनी व्यक्त केल्या. पेपर झाल्यानंतर केंद्राच्या आवारात एकमेकांशी पेपरबाबत परीक्षार्थ्यांमध्ये चर्चा सुरू होत्या. बहुतांश परीक्षार्थ्यांनी दुसऱ्या पेपरची तयारी करण्यासाठी लवकर घरी जाण्यास प्राधान्य दिले.

 

Web Title: Kolhapur: Start of HSC exam; Parents' crowd outside the centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.